दागिने चोरी करणारे दाम्पत्य अटकेत

Mumbai
Three and a half lakhs alcohol sale in bhivadi police take action on २ people
भिवंडीत साडेतीन लाखाचा गावठी दारूसाठा जप्त

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून ज्वेलर्सच्या दुकानातील दागिने चोरणार्‍या दाम्पत्याला ज्वेलर्स चालकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खारघरमध्ये घडली. राजीव विजय पांडेय (28) आणि ममता राजीव पांडेय (22) असे या दाम्पत्याचे नाव असून, या दोघांनी खारघरमधील इतर दोन ज्वेलर्स चालकांना फसविल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार पुरणसिंग राजावत हा खारघर सेक्टर-13 मधील राजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये कामास आहे, तर या प्रकरणातील आरोपी पांडेय दाम्पत्य हे शिळफाटा येथील लोढा हेवन इमारतीत राहण्यास आहे. हे दाम्पत्य दोन मुलांसह राजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेले होते. त्यावेळी पांडेय दाम्पत्याने नाकातील नथ बघताना संधी साधून त्यातील 24 नगचे नथीचे पाकीट चोरले. त्यानंतर या दाम्पत्याने एक नथ खरेदी करून दुकानातून काढता पाय घेतला. त्यावेळी दुकानातील कर्मचारी दुकान बंद करुन गेले.

मात्र दुसर्‍या दिवशी कर्मचार्‍यांनी दुकानातील दागिने तपासले असता, त्यातील नथीचे 24 नगचे पाकीट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचार्‍यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांच्या दुकानात रात्रीच्या सुमारास दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दाम्पत्याने हे दागिने चोरल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुरणसिंग राजावत याने त्यांच्या ज्वेलर्सच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चोरट्या दाम्पत्याचा व्हिडिओ व पांडेय दाम्पत्याचे फोटो टाकून सगळ्या ज्वेलर्स मालकांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

त्यामुळे खारघरमधील इतर ज्वेलर्स चालक-मालकांनी या दाम्पत्यावर लक्ष ठेवले होते. दरम्यान, चोरटे पांडेय दाम्पत्य खारघर सेक्टर-15 मधून लाल रंगाच्या हुंडाई कारमधून आपल्या दोन मुलांसह जात असताना त्या भागातील काही ज्वेलर्स चालकांना निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सेक्टर 15 मधील चौकात या दाम्पत्याची कार अडवून धरली. त्यांनतर याबाबतची माहिती पुरणसिंग राजावत याला दिली. राजावत याने तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली आणि पांडेय दाम्पत्याला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले.