घरमुंबईराजगृह Live: 'हा महाराष्ट्र धर्मावरचा हल्ला, समाज विषाणूंना नष्ट करा' - मनसेची...

राजगृह Live: ‘हा महाराष्ट्र धर्मावरचा हल्ला, समाज विषाणूंना नष्ट करा’ – मनसेची मागणी

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेकाळी मुबंईतील निवासस्थान असलेल्या राजगृह या वास्तूवर काही अज्ञातांनी हल्ला करत तोडफोड केली. यानंतर संबंध महाराष्ट्रातून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने देखील या घटनेचा निषेध केला असून एक खरमरीत ट्विट केले आहे. “हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला… हा महाराष्ट्र धर्मावरचा हल्ला… या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच पण सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाज विषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं”, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

 


राजगृहाला यापुढे २४ तास पोलीस संरक्षण मिळणार. मुख्यमंत्री यांचे गृहमंत्र्यांना आदेश दिले असल्याचे ट्विट राज्यमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -


राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे शहरात निदर्शने

राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइं आठवले गटाच्या वतीने वागळे ईस्टेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला.


राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला घटनेचा पाठपुरावा


राजगृहाचया आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्क विभागातून सांगण्यात आले आहे.


राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.


‘डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही’

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी, असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या घटनेचा राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. (सविस्तर वाचा)


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. या घटनेचा निषेध राजकीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे.मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

काय आहे प्रकरण

काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला आहे . यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले. रात्री उशीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले. दरम्यान, आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

हेही वाचा –

कानपूर गोळीबार प्रकरण : पोलिसांनी केले अमर दुबेचे एन्काऊंटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -