शासकिय विज्ञान संस्थेतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

Mumbai
Institute_of_forensic_science

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र सरकारने राज्यात नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील अग्रणी संस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या शासकिय विज्ञान संस्थेतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 25 जूनपासून सुरू झाली. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. पदवी आणि पदव्युत्तरसाठी विज्ञानाचे धडे गिरवणारी देशातील पहिली संस्था म्हणून शासकिय विज्ञान संस्थेची ओळख आहे. या संस्थेत पदव्युत्तर शिक्षणासाठी एमएस्सी केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, बॉटनी, झुलॉजी, मायक्रो बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक, एनव्हार्यमेंट सायन्स अशा नऊ विषयांत पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

या संस्थेत एमएस्सी साठी २७२ तर पीएचडीसाठी २९८ एवढी प्रवेश क्षमता आहे. वेळापत्रकानुसार एमएस्सीच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाईल. पर्यावरण शास्त्र विषयाकरीता दिनांक १७ जूलै २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता शासकिय विज्ञान संस्था येथे सीईटी परीक्षा घेण्यात येईल. अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग १ऑगस्ट, २०१९ पासून सुरू होतील.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज भरणे – 25 जून ते 15 जुलै (४ वाजेपर्यंत)
प्रवेश अर्जाची प्रिंटऑऊट घेण्याची शेवटची तारीख – 15 जुलै (४ वाजेपर्यंत)
तात्पूरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी – 16 जुलै (१२.३० वाजेपर्यंत)
विद्यार्थ्यांच्या तक्रारीबाबत – 18 जुलै (४ वाजेपर्यंत)
तक्रार दाखल करण्यासाठीचा ई-मेल [email protected]
अंतिम गुणवत्ता यादी – 19 जुलै (४ वाजेपर्यंत)
कॉऊन्सेलिंग आणि प्रवेशाची प्रथम फेरी – 22 जुलै (सकाळी 11 वाजता)
कॉऊन्सेलिंग आणि प्रवेशाची द्वितीय फेरी – 25 जुलै (सकाळी 11 वाजता)
कॉऊन्सेलिंग आणि प्रवेशाची तृतीय फेरी – 29 जुलै (सकाळी 11 वाजता)
प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना संचालकांचे मार्गदर्शन – 1 ऑगस्ट (सकाळी 11 वाजता)