घरमुंबईबेस्ट संपाची गाडी रखडलीच!

बेस्ट संपाची गाडी रखडलीच!

Subscribe

बेस्ट संपावर राज्य सरकारसोबत शनिवारी झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही. परिणामी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संपाला सातवा दिवस उजाडला आहे. बेस्ट संप आणि रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे रविवारी मुंबईकरांचे हाल झाले. शनिवारी उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. या उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर केला जाणार आहे. या अहवालावर कोर्ट काय निर्देश देईल, यावर बेस्ट संपाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र आज बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपाला आठवडा पूर्ण झाला आहे.

सुधारित वेतन करार लागू करा, दिवाळीतील सानुग्रह अनुदान त्वरित द्या, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करा, अशा अनेक मागण्यांवर मागील सहा दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजूंचे म्हणणे उच्च स्तरीय समितीने ऐकून घेतले. उच्च स्तरीय समितीने कर्मचारी संघटनांकडून लेखी स्वरूपात मागण्या मागवून घेतल्या आहेत.

- Advertisement -

मुख्य सचिव चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. तसेच उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी म्हणजे आज उच्च न्यायालयात सादर करणार आहे. न्यायालयात मांडलेल्या अहवालावर न्यायालय काय निर्देश देईल यावर बेस्टच्या संपाचे पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र या संपाला आज सातवा दिवस उजाडला आहेत. त्यामुळे मुंबईकर मागील सहा दिवसापासून बेहाल झाले आहेत. चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे अनेक मुंबईकरांचा बाहेर पडण्याचा प्लॅन होता. मात्र बेस्टचा संप सुरु असल्याने आणि त्यात रेल्वेने मेगा ब्लॉक घेतल्याने मुंबईकरांनी घरीच सुटी साजरी करण्याचा निर्णय घेतला.

जे बाहेर पडले त्यांना या बेस्ट संपाचा चांगलाच फटका बसला. बाहेर पडणार्‍या मुंबईकरांना ओला उबेर सारखी वाहतानुकूलित टॅक्सी सेवा घ्यावी लागत होती. तर काही टॅक्सी आणि रिक्षावाले अतिरिक्त पैसे उकळताना दिसून येत होते. रविवारी सुट्टी असल्यामुळे एसटी महामंडळांनेसुद्धा बसेस कमी सोडल्या होत्या. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा बट्ट्याबोळ झाला.

- Advertisement -

आज करणार मनसे राडा

बेस्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मिटविण्यात अद्याप पालिका प्रशासनाला यश आले नसून, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांचे गुर्‍हाळ अद्याप संपलेले नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका आता सामान्य मुंबईकरांना बसू लागला आहे. याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. सोमवारपासून रस्त्यावर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. त्यामुळे बेस्टच्या संपावर आज तोडगा निघाला नाही तर मनसेच्या राडा होण्याची शक्यता आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -