घरमुंबईमोटारसायकल दिली नाही मुलाने स्वतःला घेतले पेटवून

मोटारसायकल दिली नाही मुलाने स्वतःला घेतले पेटवून

Subscribe

कॉलेजला जायला वडिलांनी मोटरसायकल न दिल्याने एका अकरावीच्या विद्यार्थ्याने कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतले. यात हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भाजला असून त्याला उपचारासाठी ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. शिवम दीपक यादव (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवम दीपक यादव (17) हा अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी तो कॉलेजला आला. त्यानंतर तो वर्गात न जाता शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरील बाथरूममध्ये गेला. स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून त्याने स्वतःला पेटवून घेतले. आणि त्यानंतर तो जळालेल्या अवस्थेत बाहेर आला. यावेळी तेथील शिक्षकांनी आग विझवली. उपमुख्याध्यापक बंडू कसबे यांनी शाळेच्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सोबत घेऊन शिवमला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

तेथील डॉक्टरांनी या घटनेमागील कारण त्याला विचारले असता वडिलांनी शाळेत जाण्याकरता बाईक दिली नसल्याचे कारण त्याने सांगितले. त्याला पुढील उपचाराकरता ऐरोली येथील बर्न हॉस्पिटल याठिकाणी पाठवण्यात आले. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्चना चिवटे करीत आहे. या विद्यार्थ्याचे वडील हे पोलीस खात्यात कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -