रे रोड स्थानकांवरून जाणारा पूल वाकला; काही दिवसांसाठी वाहतूक बंद

Mumbai
reay road
रे रोड पूल

रे रोड स्थानकावरून जाणारा पुल त्याच्या पायथ्याशी वाकला असून हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रे रोड पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पुल असून एका ट्रकने धडक दिल्यामुळे हा पुल डॅमेज झाला असून वाकला असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीची माहिती मिळताच पुलावरून तसेच त्या खालून जाणारी वाहतूक काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिकेने या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या पुलासाठी ऑडिटरला नियुक्त केले असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. परंतु तोपर्यंत हे पूल बंद करण्यात आले आहे. जर हा पिलर तात्काळ बदलणे शक्य असेल तर तो तातडीने बदलला जाईल. पण तोपर्यंत हा पूल बंद ठेवावा लागेल.
– संजय दराडे, प्रमुख अभियंता, पूल विभाग

रे रोड पूल वाकला, वाहतुकीसाठी काही दिवस बंद

रे रोड पूल वाकला, वाहतुकीसाठी काही दिवस बंद

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 11, 2019