घरमुंबई31 मार्चपर्यंत बीएसयुपी प्रकल्प पूर्ण होणार 

31 मार्चपर्यंत बीएसयुपी प्रकल्प पूर्ण होणार 

Subscribe

ठाणे महापालिकेच्यावतीने खारटन रोड, सिद्धार्थनगर, पडले, ब्रम्हांड, तुळशीधाम आदी ठिकाणी बीएसयुपीतंर्गत इमारतींची बांधकामे सुरू आहेत. त्यातील बहुतांशी इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणच्या इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी 15 दिवसांत लाईट आणि पाणी जोडणी तसेच मार्च अखेरपर्यंत लिफ्टचे काम पूर्ण करण्याचे आदेश ठामपा आयुक्तांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे संकेत ठामपाकडून मिळत आहेत.

बीएसयुपी प्रकल्पातंर्गत सर्व इमातींचे काम पूर्ण करून त्या सर्व सदनिका लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. तसेच त्याचबरोबर 15 दिवसांत या सर्व इमारतींच्या ठिकाणी लाईट आणि नळजोडणी करणे आणि सहा महिन्यांपर्यंत या सर्व इमारतींची निगा आणि देखभाल महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.  रेंटल हाईसिंगमध्ये यापूर्वी ज्या प्रकल्प बाधितांना घरे देण्यात आली आहेत. त्यांची यादी अंतीम करून त्यांनी तातडीने सदनिका वितरित करण्यात येणार आहेत. तसेच ज्या इमारतींना वापर परवाना प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, त्या इमारतींना वापर परवाना देण्याबाबत प्रस्ताव सादर करणे. ज्या ठिकाणी रस्ता किंवा किरकोळ कामे अपूर्णावस्थेत आहेत ती कामे युद्ध पातळीवर पूर्ण करणे. प्रकल्प बाधित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच इतर सुविधांचा आढावा घेण्याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या अधिपत्याखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहा.आयुक्त महेश आहेर हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -