डोंगरी इमारत दुर्घटना : पायधुणीतल्या गुंडगिरीवर राजकीय पक्षांची टीका!

डोंगरी इमारत दुर्घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी भोंगळ कारभाराचा समाचार केल्याचे तीव्र पडसाद महापालिका स्थायी समितीत आज उमटले आहेत.

Mumbai
building collapse in donagri of Mumbai
मुंबई : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

डोंगरीतील केसरबाई इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद महापालिका स्थायी समितीत उमटले असून महापालिकेच्या ‘बी’ विभागातील ही घटना अपघात नसून ती मानवी हत्याच असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. ‘बी’विभाग हा गुंडांच्या हाती आहे. गुंड गँगचे रॅकेटच्या माध्यमातून याठिकाणी इमारत दुरुस्तीच्या नावाखाली पुनर्विकास केला जात असल्याचा आरोपही सदस्यांनी करत मुंबईतील आपत्कालिन यंत्रणेतील दोषांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रत्येक विभागांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आपत्कालिन आराखडा तयार करण्याचीही मागणी सदस्यांनी केली आहे.

डोंगरी ही दुर्घटना नसू हत्याच

डोंगरीतील इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्या १३ जणांना बुधवारी महापालिका स्थायी समितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलतांना समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी ही दुर्घटना नसू हत्याच असल्याचा आरोप केला. या विभागाला सक्षम सहायक आयुक्त न देता कार्यकारी अभियंत्यावरच प्रभारी जबाबदारी सोपवली जात असल्याचे सांगत रईस शेख यांनी केसरबाईशेजारील दोन मजली इमारतीच्या जागेवर १७ मजल्याची इमारत बनवली आहे. मदनपुर्‍यात ६ इमारती अतिधोकादायक असून येथील अतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी विकासक आणि अधिकारी एकत्र जातात. त्यांना माहुलला पाठवण्याची भीती दाखवतात. त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी असून विभागाचे सहायक आयुक्त, पदनिर्देशित अधिकारी यांना निलंबित करावे तसेच जे अधिकारी दहा वर्षांपासून या विभागात आहे, त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. या भागातील जुन्या इमारतींबाबत त्रिसदस्यीय समिती गठीत करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.


Viral Check: डोंगरी इमारत दुर्घटनेचा व्हायरल होणारा तो व्हिडिओ फेक


राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी २५ वर्षांपूर्वी ज्या इमारतींचे बांधकाम झालेले आहे, त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच आपत्कालिन यंत्रणा सक्षम व अत्याधुनिक बनवण्यासाठी विभागातील भौगोलिक स्थितीची माहिती घेऊन प्रत्येक विभागाचा आपत्कालिन आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना केली. मुंबईतील ९ मीटर रुंदीच्या जुन्या इमारतींच्या बांधकामाता एफएसआयचा लाभ मिळत नाही. त्यामुळे एफएसआय अथवा टिडीआर लाभ देण्याचे धोरण राबवण्याची मागणी भाजपचे अभिजित सामंत यांनी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अनधिकृत बांधकामांची जबाबदारी अधिकार्‍यांवर निश्चित करून दहा वर्षांत जे जे सहायक आयुक्त होवून गेले त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. बचाव व मदत कार्य राबवताना अग्निशमन दलाकडे अतिरिक्त वायर नव्हती. त्यामुळे अत्याधुनिक यंत्र सामृगी असलेल्या अग्निशमन दलाला केवळ अतिरिक्त वायरमुळे बचाव कार्य राबवण्यात अडचणी येत असतील तर दुदैवी असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या अधिकार्‍यांचे पूर्णपणे दुर्लक्ष

सभागृहनेत्या विशाखा राउुत यांनीही बी विभागाप्रमाणे सी विभागातही अनधिकृत बांधकामे असल्याचा आरोप करत धोकादायक इमारतींचा सर्वे स्वतंत्र न करता म्हाडा, बीपीटी व महापालिकेने संयुक्तपणे करावा, अशी सूचना केली. भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी ए विभागातील सध्या दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण इमारत नव्याने बांधली जात असल्याची छायाचित्रेच सादर करत ए, बी व ई विभागात असे धंदे चालत आहेत. परंतु याकडे महापालिकेच्या अधिकार्‍यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

महापालिकेच्या अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मागील दहा वर्षांमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली ज्या इमारतींची पुनर्रचना व पुनर्बांधकाम झाले अशा इमारतींचा अहवाल सादर केला जावा, अशी सूचना करत बी विभागासारख्या चिंचोळ्या गल्लीमध्ये अशाप्रकारची बांधकामे होत असताना महापालिकेच्या अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे बी विभागाचे आपत्कालिन व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्ट्क्चरल ऑडीट करण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळे बी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त आणि पदनिर्देशित अधिकारी यांना निलंबित करून मग चौकशी केली जावी,असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – कोसळलेली इमारत म्हाडाची नव्हतीच! ट्रस्टदेखील तोंड फिरवणार?