घरमुंबईमध्य रेल्वेच्या एक्स्प्रेस 3४२ वेळा पडल्या बंद

मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेस 3४२ वेळा पडल्या बंद

Subscribe

उपनगरीय सेवांचाही झाला खोळंबा

उपनगरीय रेल्वे मार्गांवर लांबपल्ल्याच्या गाड्यांचे इंजिन बंद पडते, तेव्हा उपनगरीय रेल्वे सेवेचा खोळंबा होतो. गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे 3४२ वेळा लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे इंजिन बंद पडले. यामुळे शेकडो लोकल सेवा रद्द कराव्या लागल्या, तर हजारो चाकरमान्यांची गैरसोय झाली. त्यामुळे रेल्वेचे इंजिन बंद पडण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेची आता डोकेदुखी वाढली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय रेल्वे मार्गावरुन लांबपल्ल्याच्या शेकडो मेल, एक्स्प्रेस ये-जा करता. तसेच दररोज मध्य रेल्वेच्या 1 हजार 732 उपनगरीय लोकल सेवा ये-जा करत असतात. मुंबई विभागात लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. तर त्याचा मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवांवर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे इंजिन बंद पडण्याचा घटना वाढल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांमध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 3४२ वेळा मेल, एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवांचा खोळंबा होतो. या घटनेमुळे प्रवाशांना लेट मार्क लागतात. 2014 ला मेल, एक्स्प्रेसचे इंजिन 49 वेळा बंद पडले होते. ही संख्या दर वर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे.

लांबपल्ल्याच्या गाड्या मुंबई बाहेर थांबवा
रेल्वे प्रवासी संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत येणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी कल्याण आणि ठाकुर्ली येथे टर्मिनल्स तयार करण्याची मागणी केली होती. मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या मुंबई येणार्‍या लांबपल्ल्याच्या शेकडो मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे, कल्याण आणि दादरला रिकाम्या होतात. तरीही त्या सीएसएकटीपर्यंत घेऊन जातात. त्यामुळे लोकल सेवांवर त्यांच्या ताण पडतो. यामुळे लोकल सेवा विलंबाने धावतात. रेल्वेने यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
– वंदना सोनावणे, अध्यक्ष, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना

- Advertisement -

इंजिन बंद पडण्याच्या घटना
2014 – 49
2015 – 55
2016 – 73
2017 – 69
2018 – 63
2019 (जून) – 33
एकूण – 3४२

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -