घरमुंबईशहापुरातील प्रभारी गटशिक्षण अधिकार्‍याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

शहापुरातील प्रभारी गटशिक्षण अधिकार्‍याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

Subscribe

गेल्या पाच वर्षांपासून प्रभारी गटशिक्षण अधिकारी असलेले आशिष झुंझारराव हे आपला छळ करत असल्याचा आरोप शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एका महिला अधिकार्‍याने केला आहे. कार्यालयात कोणतेही काम न देणे, नाहक बसवून ठेवणे, पैशांची मागणी करणे, तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा आरोप संबंधित महिला अधिकार्‍याने शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत शहापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मानसिक त्रासामुळे त्रस्त झालेल्या महिला अधिकार्‍याने यापूर्वी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, तिथून न्याय मिळत नसल्याने या वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून अखेर महिला अधिकार्‍याने पोलिसांत धाव घेऊन प्रभारी गटशिक्षण अधिकारी अशिष झुंझारराव यांच्याविरोधात तक्रार नोंद केली आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली. याप्रकरणी अशिष झुंझारराव यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या प्रकरणातील आरोपी झुंजारराव हा फरार झाला असून, शहापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले. मात्र, अद्यापही झुंजारराव हा पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी विनयभंग झालेल्या महिला अधिकार्‍यांनी आरोपी असलेल्या प्रभारी शिक्षण अधिकार्‍यांविरोधात महिला आयोगाकडेदेखील तक्रार दिली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार महिला पोलीस नाईक शुभांगी उघडे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी टी. ओ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -