घरमुंबईमुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी

मुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी

Subscribe

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरातील शेकडो भक्तांनी दिंडोशीतील प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.

दरवर्षी मुंबईच्या दिंडोशीतील विठ्ठल-रुखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. यावर्षीही कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने या मंदिरातर्फे नॅशनल चाळीत माऊलींच्या पालखीची मिरवणूक निघाली. दिंडोशीतील या मंदिराची ख्याती प्रतीपंढरपूर अशी आहे. त्यामुळे या मंदिराच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यात मुंबई शहर आणि उपनगरातील शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षीही शेकडो भाविकांनी एकत्र येऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. भाविक या मिरवणूकीत टाळ-मृदंग वाजवित ग्यानबा-तुकाराम गजरात सहभागी झाले.

हेही वाचा – दुष्काळ जाऊ दे, आरक्षण टिकू दे – चंद्रकांतदादांचे विठ्ठलाकडे साकडे

- Advertisement -

या आमदारांनी घेतला पालखीत सहभाग

या मंदिरात एकादशीच्या निमित्ताने काकड आरती, अभिषेक, हरिपाठ, सांस्कृतिक बालनृत्य आणि भजन असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दरम्यान यावर्षी दिंडोशीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराकडून काढण्यात आलेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात आमदार सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर शिवसेनेचे काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही या पालखीत सहभागी झाले.

हेही वाचा – ‘विठ्ठल’ भक्तांसाठी आनंदाची पर्वणी; हा सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

- Advertisement -

काय आहे कार्तिकी एकादशीचे महत्त्व?

या दिवशी वारकरी संप्रदायातील आणि वैष्णव पंथीय भाविक उपवासाचे व्रत करतात. या दिवशी भगवान विष्णू चातूर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेून जागी होतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार हाती घेतात. त्यामुळे या एकादशीला देवऊठी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून तुलसी विवाहाला सुरुवात होते आणि कार्तिक पौर्णिमेला या विवाहाची सांगता होते. तेव्हापासून लग्नसराईचे दिवस सुरु होतात, असे म्हटले जाते. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांची दिंडी पंढरपूरला जाते. वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशीनंतर ही दुसरी महत्त्वाची एकादशी मानले जाते. भाविक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई यांच्या पालख्या घेऊन पंढरपूरात येतात.


हेही वाचा – आणि मुख्यमंत्र्यांनी घरीच केली विठ्ठलाची पूजा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -