बाईक स्लीप होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

भायखळा येथील अपघात; आरोपी बाईकस्वाराला अटक

Mumbai
a men death in bike accident at borivali
बोरिवली येथे बाईकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

बाईक स्लीप होऊन झालेल्या अपघाात शम्स सर्फराज हुसैन राजाणी या 28 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र हा जामिनपात्र गुन्हा असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

हा अपघात शनिवारी दुपारी अडीच वाजता भायखळा रेल्वे स्थानकाजवळील ना. म जोशी मार्ग, बसस्टॉपसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शम्स राजाणी हा शनिवारी त्याचा आरोपी मित्रासोबत त्याच्या बाईकवरुन जात होता. त्याच्याकडे बाईकचा परवाना तसेच कागदपत्रे नव्हते. भरवेगात बाईक चालविण्याच्या नादात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले.

भायखळा रेल्वे स्थानकाजवळील बसस्टॉपसमोर बाईक स्लीप झाल्याने ते दोघेही खाली पडले होते. त्यात शम्स हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला तातडीने जे. जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, मात्र त्याची दुखापत असल्याने त्याचा उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी टॅक्सीचालक नजीर सलीम सय्यद यांच्या तक्रारीवरुन भायखळा पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बाईकस्वाराला अटक केली आहे.