घरमुंबईहत्तीरोगाच्या रुग्णावरही उपचार शक्य; जीटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच झाली शस्त्रक्रिया

हत्तीरोगाच्या रुग्णावरही उपचार शक्य; जीटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच झाली शस्त्रक्रिया

Subscribe

मुंबईच्याजीटी हॉस्पिटलमध्ये आता हत्तीरोगाच्या रुग्णांवरही उपचार आणि शस्त्रक्रिया करणं शक्य झाले असून पहिल्यांदाच हत्तीरोगाच्या रुग्णावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलपैकी जीटी हॉस्पिटलमध्ये आता हत्तीरोगाच्या रुग्णांवरही उपचार आणि शस्त्रक्रिया करणं शक्य होणार आहे. जीटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच हत्तीरोगाच्या एका रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन तिचं आयुष्य सुरळीत करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. पेणमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला गेल्या ३ वर्षांपासून डाव्या पायाच्या तळव्याला सूज येत होती. त्या सुजेमुळे तिच्या पावलांना त्रास होत होता आणि त्यानंतर हळूहळू सूज गुडघ्यापर्यंत चढत गेली. तीन वर्ष अनेक हॉस्पिटल्स फिरुनही त्यांच्यावर योग्य ते उपचार होत नव्हते. अखेर डॉक्टरांनी त्यांना फक्त व्यायाम आणि पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. याचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर झाला होता. शिवाय, ती सूज ही कायम राहणारी होती. एवढ्या कमी वयात अशा प्रकारचं आजार झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता.

असा होता हत्तीरोग

ही महिला फिलॅरिएसिस नावाच्या आजाराने ग्रासली होती. क्यूलेक्स या दूषित डासामुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. २२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि ७० टक्के आर्द्रता ही क्युलेक्स डासांच्या वाढीसाठी पोषक असते. या डासांची उत्पत्ती घाण आणि प्रदुषित पाण्यात मोठ्या प्रमाणात होते. हे डास चावल्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. क्यूलेक्स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्टीया हत्तारोगाच्या परोपजीवी जंतूचा प्रसार करतात. या डासाने मनुष्याला चावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी हत्तीरोगाचे जंतू शरीरात सोडतो. हा जंतू त्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणांहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतो आणि लसीका संस्थेमध्ये जातो.

- Advertisement -

राज्यात आजही हत्तीरोगावर उपचार किंवा शस्त्रक्रिया सोपी नसताना अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. भरत सक्सेना आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

अशी केली शस्त्रक्रिया 

हत्तीरोगामध्ये सफेद रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. बुचेरेरिया बॅनक्रॉप्टीया या डासाने जर चावलं तर त्या भागाला सूज येते. ती सूज कमी जास्त होऊ शकते. पण, ती कायमस्वरुपी राहिली तर त्याचं रुपांतर हत्तीरोगात होतं. त्यावर सतत जखमा होतात. या शस्त्रक्रियेसाठी मानेतील जीवंत रक्तवाहिन्या काढल्या जातात. ज्यात शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. नंतर या रक्तवाहिन्या ज्या ठिकाणी सूज आली आहे. त्या ठिकाणी दुर्बिण शस्त्रक्रियेने जोडल्या जातात.  ज्यातून त्या भागाला रक्तपुरवठा होतो आणि ती सूज कमी होण्यास मदत होते.
या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला बऱ्यापैकी फरक जाणवत आहे. विज्ञानामुळे अनेक आजारांवर आणि रुग्णांवर उपचार करणं शक्य झालं आहे. त्यामुळे,  रुग्णांना जगण्याची नक्कीच नवी आशा निर्माण झाली आहे.  – डॉ. भरत सक्सेना, प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्राध्यापक
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -