घरमुंबईरखडलेल्या सीबीटीसी प्रकल्पाला अखेर मंजुरी

रखडलेल्या सीबीटीसी प्रकल्पाला अखेर मंजुरी

Subscribe

सीबीटीसी सिग्नलने लोकल होणार हॉयटेक , यंत्रणेमुळे लोकल फेर्‍यांची संख्या वाढणार

कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम (सीबीटीसी) या अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी हालचालींनी वेग घेतला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सीबीटीसी प्रकल्पाला मंजुरी देत एमयुटीपी 3 ए मधील प्रकल्पांसाठी 50 कोटी मंजुर केले आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि लोकलच्या फेर्‍यामध्ये वाढ होईल.

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) उभारण्यात येणार्‍या सीबीटीसी सिग्नल यंत्रणेमुळे सध्या चार मिनिटांच्या अंतराने धावणार्‍या लोकल गाड्या दोन मिनिटांच्या अंतराने धावू शकतील. दोन गाड्यांमधील वेळ कमी झाल्याने लोकल गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करणे शक्य होणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सीबीटीसी प्रकल्पाला मंजुरी देत एमयुटीपी 3 ए मधील प्रकल्पांसाठी 50 कोटी मंजुर केले आहेेत. त्यामुळे रखडलेल्या सीबीटीसी सिग्नल प्रकल्पाला चालना मिळणार आहे. सीबीटीसी यंत्रणा राबविण्यासाठी 5 हजार 928 कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी लवकरच एमआरव्हीसीकडून एका खासगी कंपनीची नियुक्ती करणार आहे. सीबीटीसी यंत्रणा पहिल्या टप्प्यात सीएसएमटी ते पनवेल मार्गावर राबविण्यात येणार आहे. त्यानंतर इतर मार्गावर राबविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सीबीटीसीने लोकल फेर्‍या वाढेल
सीबीटीसी या सिग्नल यंत्रणा डिजिटल असेल. यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतील. तसेच पुढे धावत असणार्‍या लोकल गाड्यांसंदर्भातही सिग्नल मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावतील. तसेच, लोकल फेर्‍यांची संख्याही वाढण्यास मदत मिळेल. सध्या एका तासात अप-डाऊन या दोन्ही मार्गावर 18 लोकलच्या फेर्‍या होतात. नवीन सिग्नल यंत्रणेमुळे एका तासात लोकलच्या फेर्‍यामध्ये सहा फेर्‍याची वाढ होणार आहे. त्यामुळे लोकल फेर्‍यांची संख्या वाढणाार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -