घरमुंबईभेंडीबाजार क्लस्टरचा पहिला टप्पा पूर्ण

भेंडीबाजार क्लस्टरचा पहिला टप्पा पूर्ण

Subscribe

१२८ व्यावसायिकांसह ६१० रहिवाशी परतले

राज्य सरकारचा बहुचर्चित भेंडीबाजार क्लस्टर पुनर्विकासाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यात सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट प्रोजेक्टचा समावेश असून या प्रकल्पातील सुमारे १२८ व्यावसायिकांसह ६१९ रहिवाशांनी नुकताच आपल्या घरात देखील प्रवेश केला आहे. त्यानुसार आता या प्रकल्पातील दुसर्‍या टप्प्यातील कामकाजास सुरुवात केली जाणार आहे.

मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील भेंडीबाजार क्लस्टर पुनर्विकासाचे कामकाज सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट प्रोजेक्टनुसार सुरु करण्यात आले आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्याचे काम सुरु केल्यापासून येथील सामाजिक-सांस्कृतिक गरजा केंद्रस्थानी ठेवण्याच्या उद्देशाने प्रगती केली आहे. पुनर्विकासाचा मुख्य हेतू म्हणून हे लक्षात ठेवून, क्षेत्रातील सांस्कृतिक रचना टिकवून ठेवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी नवीन मास्टर प्लॅन बनविण्यात आला होता. त्यानुसार येथील रौदात तहेरा, हंडीवाला मस्जिद, हुसेनी मस्जिद, कुतुबी मस्जिद, इमामबार जैनाबिया आणि धनवाडी मस्जिद या प्रकल्पात कायम ठेवल्या जाणार्‍या 6 मालकीच्या इमारती आहेत. प्रकल्पाचा एक भाग म्हणून पुनर्वसन व सुधारित केल्या जाणार्‍या भाडेकरूंच्या मालमत्तांमध्ये मुसाफिर खाना, मसिनी माँ कबर रूम, असगरिया ट्रस्ट इमामबाडा आणि बाकर्‍या ट्रस्ट इमामवाडा अशा इमारतींचा समावेश होता. या प्रकल्पात जुन्या परिसराचे सार टिकवून ठेवण्याव्यतिरिक्त, हा प्रकल्प आधुनिक सुविधांसह नवीन आर्थिक पायाभूत सुविधांचा नमुना म्हणून तयार होणार आहे. 18.5 मीटर रुंद रस्ते (पूर्वी 6-7 मीटर अरुंद होते), पादचारी फूटपाथ, सांस्कृतिक दुकाने, प्रसिद्ध पुरातन बाजारपेठ आणि लोकप्रिय खाद्यपदार्थाच्या क्षेत्राची मूळ व्यावसायिक ओळख पुनरुज्जीवित करण्यासाठी डिझाइनमध्ये कुशलतेने एकत्रित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

हा प्रकल्प 16.5 एकर क्षेत्रात पसरला असून एकूण 3200 कुटुंबांचा समावेश आहे. त्यापैकी 3000 पेक्षा जास्त निवासी भाडेकरूंना परिसराबाहेर हलविण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त, 1200 पेक्षा जास्त व्यावसायिक भाडेकरू (1250 पैकी) भाडेकरू किंवा व्यावसायिक राहत्या जागेवर गेले आहेत. तर सेक्टर 6अ, 5अ आणि 7अ मधील इमारती पाडल्या जात आहेत. जेणेकरून सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी बांधकाम चालू ठेवता येईल.

सुमारे 100 दिवसांच्या विक्रमी वेळेत 125 जीर्ण इमारती पाडल्या आहेत. दुसर्‍या टप्प्यातील बांधकाम सुरू करण्यासाठी एकूण 230 हून अधिक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या मध्यभागी जवळपास 400 दुकानांची व्यावसायिक ट्रान्झिट सुविधा बांधण्यात आली आहे. जेणेकरून व्यवसाय सुरू असेल तर किमान शून्य विस्थापन होणार असणार आहे.

- Advertisement -

लोककेंद्री प्रकल्प असल्याने आम्हाला विश्वास आहे की या भागात राहणार्‍या आणि काम करणार्‍या विविध पार्श्वभूमीतील सर्व लोकांच्या गरजा व अपेक्षा पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच हा संपूर्ण प्रकल्प एक टिकाऊ आणि मजबूत बांधकाम तयार करण्यासाठी तयार केला गेला आहे. ज्यामुळे समृद्धीला चालना मिळेल आणि लोकांचे कल्याण होईल.    – मुस्तफा हसुंजी, प्रोजेक्टचे मास्टर प्लॅनर अँड आर्किटेक्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -