Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी गुंगीचं औषध पाजून महिलेवर चौघांनी केले अत्याचार!

गुंगीचं औषध पाजून महिलेवर चौघांनी केले अत्याचार!

Mumbai
Rape Case
प्रातिनिधिक फोटो

धारावी येथे राहणाऱ्या महिलेला मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावून तीच्या शितपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मानखुर्द येथे उघडकीस आली. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

अब्दुल जिलानी सत्तार शेख (३४), हैदर अली सरदार शेख उर्फ ​​हिरा (३५), मुराद मेहबूब शेख ऊर्फ राज (२९) मोहम्मद मुदाशीर नबी शेख उर्फ ​​रहीम (३४) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. अब्दुल शेख, हैदर आणि मुराद हे तिघे माटुंगा लेबर कॅम्प येथे राहण्यास असून मोहम्मद हा मानखुर्द साठे नगर येथे राहण्यास आहे.

पीडित महिला ही धारावी येथे राहणारी अब्दुल शेख ची तिची ओळख असल्यामुळे २४ जून रोजी अब्दूलने तीला मित्राच्या मुलाची वाढदिवसाच्या पार्टीसाठी जायचे असल्याचे सांगून तीला मोहम्मदच्या घरी घेऊन आला होता. मात्र तिकडे वाढदिवस वैगरे काही नसल्यामुळे पीडित महिला परत घरी जाण्यासाठी निघाली असता या चौघानी थांबण्यास सांगून तीला शीतपेय प्यायला दिले. शीतपेय पिताच तीला गुंगी येऊ लागल्याने ती अर्धवट शुद्धीवर असतांना या चौघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, त्याच अवस्थेत पीडित महिलेने या चौघांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तेथून पळ काढत थेट रुग्णालय गाठले.

या घटनेची माहिती रुग्णालयाकडून मानखुर्द पोलिसांना देण्यात आली,ती शुद्धीवर नसल्याकारणाने पोलिसांनी दोन दिवसानी तिचा जवाब नोंदवून चार जणांविरुद्ध सामूहिक अत्याचार, तसेच गुंगीचे औषध दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चारही आरोपींना न्यायालयाने ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


हे ही वाचा – ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्यासाठी पैजा, त्यामुळे नियुक्ता रखडल्या!