घरCORONA UPDATEबेस्ट बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; एका सीटवर बसतात दोन-दोन प्रवासी

बेस्ट बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; एका सीटवर बसतात दोन-दोन प्रवासी

Subscribe

लॉकडाऊनमुळे कोरोना आजाराचा होऊ नये यासाठी बेस्ट बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी हा नियम लागू करण्यात आला आहे. परंतु या नियमाचे काटेकोरपणे पालन होताना मात्र दिसत नाही. बेस्टमध्ये सीटवर सर्रासपणे दोन-दोन प्रवासी बसत असून मोठ्या प्रमाणात बेस्टमध्ये गर्दी वाढत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण होते. लॉकडाऊनमुळे सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास बंद असल्याने सर्वसामान्य जनता काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडतच आहे. त्यांच्या सेवेसाठी बेस्ट बसेस सुरू आहेत. मात्र लोकल बंद असल्यामुळे बसेसमध्ये गर्दी वाढत आहे. दरम्यान, बेस्ट बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी असा नियम असतानाही दोन-दोन प्रवासी सीटवर सर्रासपणे बसताना दिसत आहेत.

- Advertisement -

उभे राहून प्रवास करण्यास किमान प्रवाशांना मुभा आहे. हा नियमदेखील डावलला जात आहे. बेस्ट बसमध्ये कोणीही नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. तर गर्दी असतानाही प्रवासी बसमध्ये शिरत आहेत. आम्हाला बसमध्ये घ्या, बेस्ट आमची मालमत्ता आहे, असे म्हणत कंडक्टरला धमकावत आहेत. जादा प्रवासी झाल्याने बेस्ट कंडक्टर दरवाजात उभे राहून प्रवासी नाकारतो. अशावेळी दररोज बेस्ट प्रवासी आणि कंडक्टरमध्ये ‘तू तू मैं मैं’ होताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

चिंताजनक! महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी; केंद्राची आकडेवारी जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -