घरCORONA UPDATEकोरोनाच्या रुग्णांच्या यादीत जी-उत्तर विभाग अव्वल!

कोरोनाच्या रुग्णांच्या यादीत जी-उत्तर विभाग अव्वल!

Subscribe

मागील दोन महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रभादेवी, वरळी या जी-दक्षिण विभागाला पाय-उतार करत धारावी-माहिम व दादर या जी-उत्तर विभागाने कोरोना रुग्णांच्या यादीत अव्वल क्रमांकावर मजल मारली आहे.

मागील एक महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसार माध्यमांपासून लपवणाऱ्या प्रशासनाने आता पुन्हा एकदा रुग्णांची आकडेवारी विभागनिहाय जारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रभादेवी, वरळी या जी-दक्षिण विभागाला पाय-उतार करत धारावी-माहिम व दादर या जी-उत्तर विभागाने कोरोना रुग्णांच्या यादीत अव्वल क्रमांकावर मजल मारली आहे. जी-उत्तर विभागात एकूण २ हजार ७२८ रुग्णांची संख्या झालेली असून जी-दक्षिण विभागातील एकूण रुग्णांची संख्या १९०५ एवढी आहे. वरळी पोलीस कॉलनीत सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असतानाही जी-दक्षिण विभागाची आकडेवारी पुढे सरकत नसून पहिल्या पाचच्याही खाली या विभागातील रुग्णांची संख्या आहे.

मुंबईत २७ मे २०२०पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ६३५ एवढी झाली आहे. मात्र, आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ९ हजार ५४ रुग्ण हे बरे होवून घरी परतले आहेत. आतापर्यंत मृत्य झालेल्या रुग्णांची संख्या ११०० एवढी झाली आहे. मात्र, मुंबईत सर्वांधिक कोरोनाबाधित रुग्ण हे धारावीत आहेत. धारावी, माहिम व दादर या तिन्ही विभागांचा समावेश असलेल्या जी-उत्तर विभागात २ हजार ७२८ एकूण बाधित रुग्ण आहेत. तर भायखळा, नागपाडा, माझगाव, चिंचपोकळी या ई विभागात दुसऱ्या क्रमांकाचे अर्थात २ हजार ४३८ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर शीव, वडाळा, अँटॉपहिल या एफ-उत्तर विभागात २३७७ एवढे रुग्ण झाले आहेत. त्या खालोखाल कुर्ला एल विभागात एकूण रुग्णांची संख्या २ हजार ३२१ आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्व विभागात २ हजार ९४ एवढी रुग्णांची संख्या झालेली आहे.

- Advertisement -

मात्र, सर्वांत कमी संख्या परंपरागत आर-उत्तर अर्थात दहिसर विभागात आहे. आतापर्यंत या विभागात बाधित रुग्णांची संख्या ३०९ एवढी झाली असून त्यातील ५७ लोक बरे होवून घरी परतले आहेत. त्यानंतर चंदनवाडी, गिरगाव आदी सी विभागात ३८० रुग्ण, मस्जिद बंदर, डोंगरी या बी विभागात ४३५ रुग्ण, मुलुंड  टि विभागात ६२६ रुग्ण व आर-मध्य अर्थात बोरीवलीत ६७९ एवढी बाधित रुग्णांची संख्या झालेली आहे.

कोणत्या विभागात किती रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण

धारावी, दादर, माहिम : (जी-उत्तर विभाग- २७२८) (बरे झालेले रुग्ण-६१७)

- Advertisement -

भायखळा, मदनपुरा, माझगाव : (ई विभाग- २४३८) (बरे झालेले रुग्ण-८०३)

शीव, वडाळा, माटुंगा : (एफ-उत्तर विभाग- २३७७) (बरे झालेले रुग्ण-६७७)

कुर्ला, चांदिवली, साकीनाका : (एल विभाग- २३२१) (बरे झालेले रुग्ण-५१०)

वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व : (एच-पूर्व विभाग- २०९४)(बरे झालेले रुग्ण-६१५)

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम : (के-पश्चिम विभाग- २०४९) (बरे झालेले रुग्ण-६७४)

प्रभादेवी, वरळी, लोअरपरळ : (जी-दक्षिण विभाग १९०५) (बरे झालेले रुग्ण-८३३)

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व : (के-पूर्व विभाग १८७५) (बरे झालेले रुग्ण-५८३)

गोवंडी, मानखुर्द : (एम-पूर्व विभाग- १६९६) (बरे झालेले रुग्ण-४३५)

परळ, लालबाग, शिवडी : (एफ-दक्षिण विभाग १६४८) (बरे झालेले रुग्ण-३९६)

घाटकोपर : (एन विभाग- १५२५) (बरे झालेले रुग्ण-३००)

भांडुप, कांजूर, विक्रोळी : (एस विभाग- १२७८)(बरे झालेले रुग्ण-२७६)

चेंबूर, टिळक नगर :(एम-पश्चिम  विभाग- ११६५)(बरे झालेले रुग्ण-४२२)

ग्रँटरोड, मुंबई सेंटर :(डी विभाग- १०७५) (बरे झालेले रुग्ण-४४४)

मालाड : (पी-उत्तर विभाग- १०४९) (बरे झालेले रुग्ण -१९९)

गोरेगाव : (पी-दक्षिण- ८८९) (बरे झालेले रुग्ण-२०१)

कुलाबा, नरिमन पॉईंट, फोर्ट : (एन  विभाग- ८८२) (बरे झालेले रुग्ण -१८५)

वांद्रे-सांताक्रुझ पश्चिम : (एच-पश्चिम  विभाग- ८२३) (बरे झालेले रुग्ण-२२१)

कांदिवली : (आर-दक्षिण  विभाग- ७६७) (बरे झालेले रुग्ण- १९१)

बोरीवली : (आर-मध्य विभाग- ६७९) (बरे झालेले रुग्ण-९४)

मुलुंड : (टी  विभाग- १५२५) (बरे झालेले रुग्ण-१३६)

मस्जिद, डोंगरी : (बी  विभाग- ४३५)  (बरे झालेले रुग्ण-११५)

चंदनवाडी, गिरगाव : (सी  विभाग- ३८०) (बरे झालेले रुग्ण-७०)

दहिसर : (आर-उत्तर  विभाग- ३०९) (बरे झालेले रुग्ण-५७)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -