घरमुंबई५६ पक्षांची पुरोगामी महाआघाडी

५६ पक्षांची पुरोगामी महाआघाडी

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले आहे. महायुतीला पराभूत करण्यासाठी शनिवारी या दोन्ही पक्षांनी महाआघाडीची घोषणा केली. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर यावेळी एकूण ५६ राजकीय पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून संयुक्त पुरोगामी महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनादेखील स्थान देण्यात आले आहे. शेट्टी यांच्यासाठी दोन जागा सोडण्याचा निर्णय यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे घेण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने जागा वाटपांचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस २४, राष्ट्रवादी २० आणि मित्रपक्षांसाठी ४ जागा सोडण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आल

संयुक्त पुरोगामी महाआघाडीची पहिली पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत पार पडली. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. मात्र, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थितीत होते.

- Advertisement -

काँग्रेसवर हल्लाबोल चढविताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘भाजपने जुमलेबाजी केली. देशातल्या मतदारांच्या मनात सत्ताधार्‍यांबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे. जातीजातीत भांडण लावण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केले. राजकीय फायद्यासाठी भीमा कोरेगाव या सत्ताधार्‍यांनी घडवून आणला, असा घणाघाती आरोप यावेळी त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की,‘आमचा प्रयत्न होता की, आणखी काही पक्षांनी महाआघाडीत सामील व्हावे. पण भाजपने साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करुन काही पक्षांना आपल्या बाजूला घेतले. भाजप आणि त्या पक्षांना जनता माफ करणार नाही. मागच्या पाच वर्षात राज्य-देशात जुमलेबाजी सुरू आहे. मतांचे विभाजन टाळून सर्वांनी एकत्र यायला हवे. जनतेचा कॉल लक्षात घेऊन आम्ही महाआघाडी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सरकारने केले. भीमा कोरेगावसारखी दंगल घडवून आणली. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना मोकळे सोडण्याचे काम केले असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे गुपचूप पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश देतात आणि दुसर्‍या बाजूला देशातील नागरिकांना वेगळेच सांगतात. मोदी सार्वजनिक जीवनात आणि खासगी जीवनात वेगळेच वागतात. सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव मिळावा आणि शेतकरीचे जीवन सुकर व्हावे, असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

किटकनाशकाने कमळ नष्ट करा – राजू शेट्टी
भाजपने सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार यांचा सर्वांचाच विश्वासघात केला. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले आणि लुच्चे लोकांचे सरकार आम्हाला मिळाले. सामाजिक आणि धार्मिक ऐक्य धोक्यात आणले आहे. संताचा आणि समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र जाती जातीत, धर्मात तिरस्कार निर्माण करुन राजकारण करण्याचा हिडीस प्रयत्न या सरकारने केला. सामाजिक ऐक्य धोक्यात आले असताना संविधान बदलू, अशा प्रकारच्या वल्गना केल्या. लोकशाही टिकवणार्‍या सुप्रीम कोर्ट, सीबीआय अशा संस्था धोक्यात आल्या. माझ्या सारख्या शेतकर्‍याला वाटतंय की किटकनाशके फवारुन हे कमळाचे पिक आता नष्ट केले पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी केले.

ती तर भाजपाची बी टीम

यावेळी विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, ‘वेळ पडली तर १० जागा मित्र पक्षांना द्यायच्या. ३८ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने लढायचा, असा निर्णय घेतला होता. काहींना आम्ही ६ जागा द्यायला तयार होतो. मात्र त्यांनी शेवटच्या दिवसांपर्यंत अनेक कारणे देत महाआघाडीत येण्याचे टाळले. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की, जे महाआघाडीत आले नाहीत ते भाजपची बी टीम आहे. ज्यावेळेस सेना-भाजपचे सर्व उमेदवार जाहीर होतील तेव्हा यादी पाहा. त्यात २५ टक्के उमेदवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील आहेत. चौकशी लावून सत्तेचा गैरवापर करुन भाजपा लोकांना आपल्याकडे खेचत आहे.

चर्चा विखे पाटलांच्या अनुपस्थितीची
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ५६ पक्षांना एकत्र आणत महाआघाडी जाहीर केली खरी. पण या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते. मुलगा सुजय विखे पाटील यांनी पक्षांतर केल्यानंतर ते या पत्रकार परिषदेला अनुपस्थित असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -