घरमुंबईपालघरचा नगराध्यक्ष कोण ?

पालघरचा नगराध्यक्ष कोण ?

Subscribe

उद्या मतदार कौल देणार

पालघर नगपरिषदेच्या 14 प्रभागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी उद्या मतदान होणार असून घड्याळ,धनुष्यबाण की बॅटचा उमेदवार नगराध्यक्ष होणार याचा कौल मतपेटीत बंद होणार आहे.रविवारी 14 प्रभागातील 28 जागांसाठी मतदान होणार आहे. एका मतदाराने आपल्या प्रभागातील अ आणि ब मधील दोन उमेदवारांसह नगराध्यक्षांना मतदान करायचे असल्यामुळे या मतदान प्रक्रियेत उत्साह निर्माण झाला आहे. सुचकांच्या सह्या नसल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी तीन उमेदवारांचे अर्ज बाद केले होते.

या उमेदवारांनी न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर त्यांचे अर्ज ग्राह्य ठरविण्यात आले. त्यामुळे येथील 28 जागांसाठी 191 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.उज्वला काळे, शिवसेनेच्या डॉ.श्वेता पाटील आणि अपक्ष उमेदवार अंजली पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 47 हजार 850 मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत.तर नगरसेवकपदासाठी 2 अ,5 अ,7 अ,8 ब,9 अ आणि 12 अ प्रभागात दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.3 अ,4 अ,4 ब,5 ब,6 ब, 8 अ,10 ब,13 अ आणि 14 मध्ये तिरंगी लढत होणार आहे.तर 1 अ,1 ब,9 ब आणि 12 ब या चार प्रभागात चार-चार उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उर्वरीत प्रभागांमध्ये चारपेक्षा अधिक उमेदवारांमध्ये लढती होत आहेत.

- Advertisement -

24 तारखेला होणार्‍या या मतदानानंतर दुसर्‍याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार असून त्यासाठी 14 टेबल लावण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी 9 झोनल अधिकार्‍यांसह 372 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून केंद्रात उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी यापैकी फक्त एकालाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्यामुळे शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी या नगरपरिषदेच्या निवडणूकीत डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -