घरमुंबईमागण्या मान्य होईपर्यंत आरोग्यसेविकांचा बेमुदत संप

मागण्या मान्य होईपर्यंत आरोग्यसेविकांचा बेमुदत संप

Subscribe

आज आरोग्यसेविका विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने धडकणार आहेत. आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांची पुर्तता अद्याप झालेली नसल्याने त्यांनी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्यसेविकांनी न्याय मागण्यासाठी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांची पुर्तता अद्याप झालेली नाही. त्यांच्या या मागणया पूर्ण होत नसल्यामुळे आरोग्यसेविका मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने धडकल्या आहेत. यावेळी आरोग्य सेविका संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देविदास यांनी ‘माय महानगरशी’ बोलताना सांगितले की जोपर्यंत आरोग्यसेविकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर बेमुदत संप असाच सुरू राहील. याआधी गेल्या महिन्यातच महिला आरोग्य सेविकांनी देखील पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयावर देखील मोर्चा काढला होता.

या मागण्यांसाठी आंदोलन

हे आंदोलन किमान वेतन, प्रसुती रजा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता यासाठी करण्यात आले होते. केंद्र आणि राज्य सरकारने बनवलेले कामगार कायदे हे आरोग्य सेविकांनाही लागू आहेत. मात्र असे असून देखील महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या ४ हजार आरोग्य सेविकांना अद्याप महापालिकेकडून याचा लाभ देण्यात येत नसल्याचे या आंदोलनाच्या दरम्यान सांगण्यात आले होते. यापूर्वीही विविध मागण्यांसाठी महापालिकेतील आरोग्य सेविकांनी आंदोलन केली होती. परंतु त्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे.

- Advertisement -

आरोग्यसेविकांच्या विविध मागण्यां पुर्ण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यामुळे थोड्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. परंतु पालिकेने अद्यापही आमची दखल घेतलेली नाही. आरोग्यसेविकांना किमान वेतनाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. पण तो मिळत नाही. परंतु तरिही पालिका अधिकारी गप्प आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर आम्ही बेमुदत संप सुरूच ठेवू.  – आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास

मी १९९१ पासून आरोग्य सेविका म्हणून काम करत आहे. तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती‌ तशीच आहे. आमच्याकडून भरपुर प्रमाणात कामं करून घेतात. मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू होऊ देत आम्ही अख्ख्या झोपडपट्टीत फिरतो. लोकांकडून माहिती गोळा करतो. ती पुढे नर्सला देतो तरी आरोग्य अधिकारी आम्ही काहीच काम करत नाही असं म्हणतात. काम करूनही आम्हाला सुट्टी मिळत नाही. सुट्टी घेतली तरी त्याचे पैसे कापले जातात. लोकांच्या आरोग्यासाठी करुन आता आमचं आरोग्य बिघडत चाललं आहे.  – सुनंदा लक्ष्मण मानके, आरोग्य सेविका, अॅण्टॉप हिल हेल्थ पोस्ट

मेडिकल क्लेमची ही सुविधा नाही 

आतापर्यंत ५ हजार रुपये या मानधनात आम्ही काम करतो. आम्हाला मेडिक्लेमची सुविधा नाही. ओटीपण मिळत नाही. सुट्टी घेतली तरी पैसे कापले जातात. टीबी रुग्णांना शोधण्यासाठी दारोदारी भटकावं लागतं.  – नम्रता शिंदे, आरोग्य सेविका, डॉनबॉस्को हेल्थ पोस्ट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -