घरमुंबईआरटीई प्रवेशाची तिसरी लॉटरी जाहीर

आरटीई प्रवेशाची तिसरी लॉटरी जाहीर

Subscribe

पहिल्या दिवशी राज्यातून 421 तर मुंबईतून फक्त 9 प्रवेश

बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसारची (आरटीई) प्रवेश प्रक्रियेच्या तिसरी प्रवेश फेरी बुधवारी रात्री उशीरा जाहीर झाली. आरटीईच्या तिसर्‍या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली. तिसर्‍या फेरीच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून फक्त 421 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर मुंबईतून फक्त नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे आरटीईच्या तिसर्‍या फेरीला मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे.

आरटीई प्रवेशांतर्गत समाजातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. परंतु ऑनलाईन राबवल्या जाणार्‍या प्रवेश प्रक्रियेमध्ये येणार्‍या तांत्रिक अडचणी व सरकारी अनास्थेमुळे अनेक जागा रिक्त राहतात. यंदाही पहिल्या दोन फेर्‍यांनतर तब्बल 49 हजार 754 जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र 10 जुलैला शिक्षण विभागाने राज्यस्तरीय तिसरी फेरी जाहीर केली. तिसरी फेरी जाहीर केल्यानंतर निवड झालेल्या पालकांना 11 जुलैला एसएमएस पाठवण्यात आले आहेत. एसएमएस मिळालेल्या पालकांनी 18 जुलै पर्यंत प्रवेश घ्यावयाचा आहे. ज्या पालकांना एसएमसएस आले नसतील त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अ‍ॅप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का पाहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. मात्र तिसरी फेरी जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यभरातून फक्त 421 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने आरटीईचे प्रवेशाचा आकडा 67 हजार 475 इतका झाला आहे. तर मुंबईतून अवघ्य नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने मुंबईतील प्रवेशाचा आकडा 3 हजार 155 वर पोहचला आहे.

- Advertisement -

पालकांनी मेसेजवर अवलंबून राहू नये
लॉटरी संदर्भातील एसएमएस 11 जुलैपासून पालकांना पाठवण्यात आले आहेत. परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नये. त्यांनी ११ ते १८ जुलै २०१९ पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घ्यावेत असे शालेय शिक्षण विभागाने आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -