घरमुंबईMMRDA च्या ढिसाळ कारभारामुळे करोडो रुपयांचे नुकसान

MMRDA च्या ढिसाळ कारभारामुळे करोडो रुपयांचे नुकसान

Subscribe

गेल्या ४ वर्षांपासून हे काम रखडले असून पूर्वी उल्हासनगर ते अंबरनाथ पर्यंतच्या एका लेन मध्ये पेव्हर ब्लॉक लावले होते. आता हे पेव्हर ब्लॉक काढून पुन्हा काँक्रीटीकरण केल्याने नुकसान

कल्याण – कर्जत राज्यमार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम MMRDA मार्फत सुरू आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे काम रखडले असून पूर्वी उल्हासनगर ते अंबरनाथ पर्यंतच्या एका लेन मध्ये पेव्हर ब्लॉक लावले होते. आता हे पेव्हर ब्लॉक काढून पुन्हा काँक्रीटीकरण केले जात आहे. यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कल्याण-कर्जत महामार्ग हा उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातून जात असून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्त्याचे रुंदीकरणाचे काम केले जात आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी MMRDAने उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपालिकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमणे काढून टाकण्यास सांगितले होते, त्यानंतर दोन्ही नगरपालिकांनी जवळपास अडीच हजार बांधकामे निष्कसित केले होते.

या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे, उल्हासनगर किंवा कोणत्याही नगरपालिकेच्या तुलनेने जेव्हा MMRDA जेव्हा विकासकामे करते तेव्हा ते काम नियोजनबद्ध असेल, अशी अपेक्षा असते मात्र दुर्दैवाने त्यांची कामे देखील नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी परिसरातील छोटासा रस्ता बनविण्यास देखील MMRDAला तब्बल २ वर्षे लागली होती. आता कल्याण-कर्जत महामार्गच्या कामात देखील त्याच प्रकारचा ढिसाळपणा दिसून येत आहे.
-राज असरोंडकर ( अध्यक्ष, कायद्याने वागा संघटना )

- Advertisement -

त्यानंतर सिमेंट काँक्रीटकरणचे काम सुरू झाले, मात्र हे काम पूर्णपणे झालेले नाही . उल्हासनगर ते अंबरनाथ शहराच्या ३ किलोमीटरच्या हद्दीत कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या एका लेन मध्ये पेव्हर ब्लॉक लावले गेले होते, मात्र आता हे पेव्हर ब्लॉक उखडून तेथे पुन्हा सिमेंट काँक्रीटकरण केले जात आहे. जर सिमेंट काँक्रीटकरण करायचे होते तर तेथे पेव्हर ब्लॉक का लावले गेले, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या नवीन कामामुळे वाहतूकवर देखील परिणाम होत आहे.
MMRDAच्या या चुकीमुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

हा रस्ता पूर्वी ६० फूट बनविण्याचे ठरले होते त्याप्रमाणे चौपदरी करण्याचे काम सुरू होते, मात्र नवीन विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता सहा पदरी करण्याचे निश्चित झाल्याने आता १०० फुटी रस्ता बनविण्यात येत आहे. त्यामुळे हे पेव्हर ब्लॉक काढून टाकण्यात येत आहे. या कामामुळे कोणतेही नुकसान झालेले नसून उलट रस्ता मोठा केल्याने नागरिकांची सुविधा होणार आहे.
-सिद्धेश्वरी टेंभुर्णीकर ( एम एम आर डी ए प्रशासन अधिकारी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -