घरमुंबईगुंतवलेली रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष

गुंतवलेली रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष

Subscribe

नऊ जणांची एक कोटींना फसवणूक, ठाणे पोलिसांनी लावला टोळीचा छडा

सात लाख ५० हजार गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला दिवसाला एक टक्का रक्कम फायदा म्हणून देणार, अशी रक्कम सुमारे 200 दिवस दिली जाणार, असा साडेसात लाखांमागे एकूण 21 लाख रुपयांचा फायदा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची बोगस कंपन्यांद्वारे फसवणूक करणार्‍या टोळीला ठाणे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुरुवारी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली.

रेडरॉकगेम, टिप्सझोन अँड. प्रा.लि. किप्टो ट्रेड, जब्ल्युएस, जिआकूल अशा बनावट नावाच्या कंपन्यांद्वारे अनेकांना दिवसाला एक टक्का व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर संबंधितांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडण्यात आले. यामध्ये 7 लाख 50 हजार गुुंतवणूक केल्यास 200 दिवसांत 21 लाख मिळणार, शिवाय गुंतवणूक करणारे अधिक मेंबर कंपनीला मिळवून दिले, तर तो मेंबर जितकी रक्कम गुंतवणूक करेल त्याच्या तीन टक्के रॉयल्टीही दर आठवड्याला मिळणार, अशाप्रकारचे आमिष आरोपी टोळीकडून दाखवण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांची १ कोटी ४० लाख २७ हजार ५०० रुपयांना फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

यातील मुख्य आरोपी (प्रकाश गोविंद मोरे. रा. कल्याण) याला गोपनीय माहितीद्वारे अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे या गुह्यातील आणखी आरोपींना पकडण्यासाठी दोन टीम गुजरात आणि दिल्ली येथे रवाना करण्यात आल्या. यामध्ये सुरत येथे ज्याच्या नावावर पैसे जमा करण्यात आले होते. तो उमंग कनकभाई शहा आणि अजय महेंद्रचंद जरीवाला यांना सुरत येथून अटक करण्यात आली. तसेच दिल्ली येथून रितेश सुरेशचंद्र पटेल या मूळच्या गुजरात येथील रहिवाशाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. याशिवाय यातील आणखी एक साथीदार कंपनीचा दुसरा बोगस डायरेक्टर संदीप गोविंद पाटील याला ठाणे येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -