घरमुंबई५६९ पुरुषांनी केला महिलांच्या डब्यातून प्रवास

५६९ पुरुषांनी केला महिलांच्या डब्यातून प्रवास

Subscribe

अनधिकृत प्रवाशांवर ऑपरेशन विश्वास अंतर्गत कारवाई

लोकलमध्ये महिलांकरिता राखीव असलेल्या डब्यांमधून पुरुष प्रवासी देखील सर्रास प्रवास करताना दिसून येतात.त्यामुळे अशा महिलांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍या पुरुष प्रवाशांच्या विरोधात मध्य रेल्वे प्रशासनाने ऑपरेशन विश्वास सुरु केले आहे.या अंतर्गत गेल्या १५ दिवसांमध्ये ५६९ पुरुष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ७० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.आश्चर्याची बाब म्हणजे हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकात सर्वाधिक म्हणजेच १०४ पुरुषांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

लोकलने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत.त्यामध्ये सीसीटीव्ही,टॉकबॅक प्रणालीचा देखील समावेश आहे.तरीदेखील महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होत नाहीत. काही दिवसांपूर्वी मुंबई रेल्ेव विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये लोकलने प्रवास करणार्‍या सुमारे ४५ टक्के महिला प्रवासी प्रवासादरम्यान असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.या अहवालानंंतर रेल्वे प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे.

- Advertisement -

स्थानके – कारवाई –  दंड
मानखुर्द – १०४ – २०हजार ५००रु
वडाळा – ७० – १५हजार ६००रु
कुर्ला – ६८ – १९हजार १००रु
घाटकोपर – ५७ – १०हजार ९००रु
कल्याण –  ३९ – ६ हजार रु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -