घरमुंबईआजपासून पाच दिवस मंत्रालय बंद

आजपासून पाच दिवस मंत्रालय बंद

Subscribe

सलग पाच दिवस मंत्रालयाल बंद राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यात राज्य मंत्रीमंडळाकडून एकही महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार नाही.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने मंत्रालयालाही सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी बुधवार ते शुक्रवार अशी आहे. परंतु, या सुट्यानंतर महिन्याचा दुसरा शनिवार आल्यामुळे या तीन दिवसांच्या सुट्यांना जोडून शनिवार आणि रविवारचीही सुट्टी मंत्रालयाला मिळाली आहे. त्यामुळे मंत्रालय पाच दिवस बंद होणार आहे. परंतु, याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे.

हेही वाचा – अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार

- Advertisement -

राज्यभरातून येणाऱ्या जनतेचे हाल

मंत्रालयाला सलग पाच दिवस सुट्टी दिली गेल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत. दररोज राज्यभरातून शेकडो लोक मंत्रालयात कामानिमित्ताने येतात. त्यामुळे या आठवड्यात मंत्रालयाला कामानिमित्ताने मुंबईला येणाऱ्या सर्वसामान्याच्यांचे हाल होणार आहे. सोमवारपासून मंत्रालयात सुट्टीचे वातावरण दिसत होते. अनेक अधिकारी काम करण्याच्या मुडमध्ये नव्हते, तर काही अधिकारी सुट्टीच्या अगोदरच कामावर गैरहजर होते. अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार होती. मात्र, बहुतांश मंत्री मुंबईबाहेर होते. त्यामुळे ही बैठक झाली नाही. ही बैठक आता पुढील आठवड्यातच होईल. त्यामुळे या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात कुठवलाही निर्णय होणार नाही. तर दुसरीकडे शेतकरी सरकारकडे काहीतरी आर्थिक मदतीची आशा करत आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. परंतु, या आठवड्यात मंत्रालयाला सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही निर्णय जाहीर होणार नाही.


हेही वाचा – मंत्रालयातील अधिकारी मस्त, सुरक्षारक्षक मात्र त्रस्त

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रालय की आत्महत्यालय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -