घरमुंबईधो धो पावसात मेट्रोचे काम ‘नॉनस्टॉप’!

धो धो पावसात मेट्रोचे काम ‘नॉनस्टॉप’!

Subscribe

पावसाने मुंबईकरांना बेजार केले असले तरी मुंबईतील मेट्रो ३चे काम मात्र नॉनस्टॉप सुरु आहे. याच कामाचा घेतलेला आढावा.

दोन दिवसांपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाने मुंबईकरांना बेजार केले असले तरी मुंबईतील मेट्रो ३चे काम मात्र नॉनस्टॉप सुरु आहे. महत्त्वाची बाब अशी की, बुधवारी या कामाची वर्षपूर्ती झाली असून टनेल बोअरिंगच्या कामाने ५ किलोमीटरचा टप्पा गाठला आहे. मेट्रो ३ साठी भुयारीकरणाचे काम सुरु झाल्यापासून एका वर्षात हे काम झाले असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे.
टनेलच्या कामासाठी टीबीएम लाँचिंग शाफ्टद्वारे टनेल बोअरिंगचे काम सुरु आहे. मुंबईमध्ये सध्या १५ टीबीएम मशीन आल्या आहेत. त्यापैकी ८ मशीन या कार्यरत आहेत आणखी ३ मशीन या जुलै अखेरीस भूगर्भात सोडण्यात येणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत सगळ्या १७ टीबीएस मशीन कार्यान्वित होतील, असे देखील मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भुयारीकरणाच्या कामाचा वेग वाढणार

सध्या टनेल बोअरिंग मशीन प्रत्येक आठवड्याला सरासरी ३५० मीटर या गतीने भुयारीकरणाचे काम करत आहे. हा वेग ऑक्टोबर महिन्यानंतर ७०० ते ८०० मीटर इतका वाढणार असल्याचेही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कोणत्या टप्प्यात किती काम

आझाद मैदान लॉट शाफ्ट – पॅकेज २ मधील वैतरणा १ आणि वैतरणा २ या टीबीएम्सने १०५० मीटरचे भुयारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. तर ग्रँट रोडपर्यंतचा ४.५ किमीचा पल्ला या टीबीएमला गाठायचा आहे.

नयानगर लाँच शाफ्ट पॅकेज 4 मधील कृष्णा १ आणि २ या टीबीएम्सने २१६४ मीटरचे भुयारीकरण केले आहे. दादर मेट्रो स्टेशनचा २.५ किमीचा पल्ला गाठायचा आहे.

- Advertisement -

विद्यानगरी लाँच शाफ्ट – पॅकेज ५ मधील गोदावरी १ आणि २ या टीबीएम्सने १०७३ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ स्टेशनपर्यंत २.९८ किमीचे भुयार तयार करायचे आहे.

मरोळ नाका लाँच शाफ्ट पॅकेज ७ मधील वैनगंगा १ आणि २ या टीबीएम्सने ८९६ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशनपर्यंत १.२ किमी भुयाराचा टप्पा या टीबीएमला गाठायचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -