घरमुंबईएलईडींनी उजळली बोरीवलीच्या चंदावरकर रोडवरील वाहतूक बेटे

एलईडींनी उजळली बोरीवलीच्या चंदावरकर रोडवरील वाहतूक बेटे

Subscribe

एलईडी दिव्यांनी सुशोभीकरण करत महापालिकेने नवीन संकल्पना राबवली आहे.

मुंबईतील वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्यात येत असून नाविन्यपूर्ण प्रयोग करून नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. त्यामुळे रोपट्यांची लागवड करून आकर्षक फुलांच्या झाडांनी वाहतूक बेटे सुशोभीकरण करण्याबरोबरच अनोख्यापद्धतीची संकल्प चित्रे उभारली जात आहेत. आता या वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणात नवीन संकल्पना पुढे आली ती म्हणजे एल.ई. डी दिव्यांची. बोरिवली पश्चिम चंदावरकर रोडवरील वाहतूक बेटांचे एल.ई. डी दिव्याद्वारे सुशोभीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने प्रायोगिक तत्वावर बनवलेल्या या वाहतूक बेटांचे मॉडेल मुंबईतील अन्य विभागामध्ये लागू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी काही महिन्यांपूर्वी सर्व सहायक आयुक्तांसह उपायुक्तांची बैठक घेवून आपल्या विभागांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर/मध्य विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी आपल्या विभागातील देखभाल विभागाच्या सहायक अभियंत्यांच्या चमुसोबत चर्चा करून नवीन संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये त्यांनी वाहतूक बेटे एल.ई.डी दिव्यांनी सुशोभित केल्या आहेत. बोरीवली पश्चिम येथून गोराईकडे जाणार्‍या रस्त्यांवर सात ठिकाणच्या वाहतूक बेटांचे सुशोभिकरण अशाप्रकारे एल.ई.डी दिव्यांद्वारे केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आरपीएफच्या खांद्यावर लागणार बॉडी वॉर्न कॅमेरे

महापालकेच्या आर/मध्य विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी बोलताना, आजवर अनेक वाहतूक बेटांचे सुशोभिकरण एकाच प्रकारे करण्यात येते. त्यामुळे आपण काही तरी नाविन्यपूर्ण करावे याच दृष्टीकोनातून एल.ई.डी दिव्यांद्वारे वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला. बर्‍याचदा वाहने चालवणार्‍यांना वाहतूक बेटांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरघाव वाहने चक्क या वाहतूक बेटांना आदळले जातात. परिणामी त्यांचे कर्बस्टोन खराब होतात. त्यामुळे अशाप्रकारच्या एल.ई.डी दिव्यांमुळे वाहन चालकांना रात्रीही याचा अंदाज येईल आणि तो सुरक्षित वाहन चालवेल. तसेच अशाप्रकारच्या दिवे उजळल्याने दिसण्यासही छान दिसते. त्यामुळेच बोरीवली पश्चिमपासून गोराई रोडपर्यंत जाणार्‍या चंदावरकर रोडवरील सात चौकांमध्ये अशाप्रकारचा प्रयोग केला आहे. प्रायोगिक तत्वावर या दिव्यांद्वारे वाहतूक बेटे सुशोभित करण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते दुभाजकांवरही अशाचप्रकारचा प्रयोग करण्याचा विचार असल्याचेही कापसे यांनी स्पष्ट केले. परिमंडळ उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात नविन संकल्पना राबवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -