घरमुंबईपालिकेच्या खड्डयांपेक्षा एमएसआरडीसीचे खड्डे मोठे असल्याचा पालिकेचा दावा

पालिकेच्या खड्डयांपेक्षा एमएसआरडीसीचे खड्डे मोठे असल्याचा पालिकेचा दावा

Subscribe

महापालिकेच्या खड्डयांपेक्षा एमएसआरडीसीचे खड्डे मोठे - पालिका अधिकाऱ्याचा अजब दावा

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येने नागरिक हैराण झाले असतानाच खड्डे बुजविण्यापेक्षा कोणाचे खड्डे मोठे यावरून पालिका अधिकाऱ्यांमध्ये खल सुरू आहे. महापालिकेच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांपेक्षा एमएसआरडीसीचे खड्डे अधिक मोठे असल्याचे अजब विधान केडीएमसीचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केल्याने सभापतीसह नगरसेवकानी नाराजी व्यक्त केली. शहराविषयी पालिकेला किती कळवळा आहे हेच यातून स्पष्ट होत आहे.

“महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर असणारे खड्डे हे एमएसआरडीसीच्या रस्त्यावरील खड्डयांपेक्षा छोटे आणि कमी खड्डे आहेत. जे पाऊस कमी झाल्यावर भरण्याचे काम केले जाईल”.

– रघुवीर शेळके, कार्यकारी अभियंता

- Advertisement -

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधी एकदा हे खड्डे बुजवले जातात आणि त्रासातून आमची सुटका होते? या विवंचनेत सामान्य नागरिक असताना इकडे महापालिकेचे अधिकारी मात्र आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या विधानावरून स्पष्ट होते आहे अशी नाराजी नगरसेवक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

शहरातील रस्ता हा महापालिकेचा आहे की एमएसआरडीसीचा याची नागरिकांना माहिती नसते. त्या विषयी त्यांना काही देणेघेणेही नसते. चांगल्या सुविधा मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा असताना मग महापालिका आणि एमएसआरडीसी हा भेदभाव कशासाठी? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार …

”महापालिका अधिकाऱ्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. शहरातील खड्डे भरण्याचे काम व्यवस्थित न झाल्यास अधिकऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच कंत्राटदारांनाही ब्लॅकलिस्ट करण्यात येईल”. – दिपेश म्हात्रे, सभापती स्थायी समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -