घरमुंबईव्यसनमुक्ती केंद्रातील तरुणाची हत्या

व्यसनमुक्ती केंद्रातील तरुणाची हत्या

Subscribe

सहा जणांना हत्येप्रकरणी अटक

पनवेल तालुक्यातील सांगुर्ली गाव येथील असलेल्या हार्मोनी फाऊंडेशन अल्कोलीक अ‍ॅण्ड ड्रग्ज रिहॅबिलेटेशन सेंटरमधील 6 जणांना पनवेल शहर पोलिसांनी त्या केंद्रात उपचार घेत असलेल्या एका आजारी व्यक्तीच्या खूनप्रकरणी अटक केली.
तक्रारदार मधुकर पवार यांचा 42 वर्षांचा मुलगा प्रशांत पवार यांना हार्मोनी फाऊंडेशन अल्कोलीक अ‍ॅण्ड ड्रग्ज रिहॅबिलेटेशन सेंटरमध्ये व्यसनमुक्तीकरिता दाखल करण्यात आले होते, परंतु दरम्यान तो काविळने आजारी असल्याचे समजल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता आधार हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले. याविषयी त्यांच्या वडिलांनाही संस्थेकडून माहिती देण्यात आली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही बाजूच्या बरगडीला मल्टी फॅक्चरसारख्या गंभीर दुखापती झाल्या असल्याने त्याला मुंबई येथील नायर हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात पोलिसांनी संस्थेतील आरोपींकडे चौकशी केली. त्यावेळी तो पडून त्याला दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, त्याला मारहाण करून त्याला काविळ असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून फरार आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी अभिजीत पाटील (26 रा.नेहुली), शेखर पवार (32 रा.नेरुळ), संदीप परदेशी (41 रा.गोराई-2, बोरिवली), हरिष घरत (32 रा.अलिबाग), देवेंद्र पाटील (20, रा.अलिबाग), रुपेश पाटील (28 रा.अलिबाग) यांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -