घरमुंबईकल्याण डोंबिवलीत कोरोना रूग्ण दहा हजारपार

कल्याण डोंबिवलीत कोरोना रूग्ण दहा हजारपार

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी 471 नवीन रूग्ण आढळून आले तर 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दहा हजार पार झाल्याने चिंता अधिकच वाढली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका क्षेत्रात 12 जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कल्याण डोंबिवलीत कारोनाचा विळखा वाढत असून दररोज चारशेच्यावर रूग्ण आढळून येत आहेत. बुधवारी नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याण 228 डोंबिवली 206, टिटवाळा आंबिवली, पिसवली 37 रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 10 हजार 371 वर पोहचली आहे. सध्या 5 हजार 247 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण 4 हजार 946 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात 13 मार्च रोजी पहिला रूग्ण आढळला. दररोज 20 ते 25 रूग्ण संख्येचा आकडा आता थेट साडेचारशे पाचशेवर पोहचला आहे. साधारण एक हजार रूग्णांचा आकडा गाठायला मार्चपासून ते मे अखेरपर्यंत तब्बल देान महिने लागले होते. मात्र जून महिन्यापासून कोरोना रूग्ण संख्येचा ग्राफ झपाटयाने वाढताना दिसत आहे. 1 जून ते 15 जूनपर्यंत 1274 रूग्ण आढळून आले.

- Advertisement -

तर 16 ते 30 जून या दरम्यान हा आकडा चौपट होऊन 4 हजार 302 रूग्णांची नोंद झाली. जून महिन्यातच रूग्ण संख्या साडेपाच हजारावर पोहचली. तर 1 जूलैपासून ते 8 जूलैपर्यंत तब्बल 3776 रूग्ण आढळून आले आहेत. एकिकडे रूग्ण संख्येचा वेग झपाटयाने वाढत असतानाच मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. दररोज सरासरी दोन ते तीन रूग्णांचा मृत्यू होत असून, आतापर्यंतच्या मृतांचा आकडा 127 वर पोहचला आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर 12 जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश येईल असेच चित्र दिसून येत आहे.

काय आहेत सोयी सुविधा …
महापालिकेने 17 खाजगी रुग्णालयासोबत सामजंस्य करार केला आहे. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकूलातील बंदिस्त बॅडमिंटन कोर्ट येथील 30 बेडचे आय.सी.यु व 155 बेडचे ऑक्सिजन सुविधा सुरु करण्यात आली आहे. डोंबिवलीतील जिमखाना येथ 70 बेडचे आय.सी.यु. व 30 बेडचे ऑक्सिजन सुविधा तसेच बीओटी तत्वावरील आर्ट गॅलरीमध्ये 120 बेडस आय.सी.यु व 250 बेडचे ऑक्सिजन सुविधा 15 जुलै, 2020 कार्यान्वित होणार आहे. आता सुमारे 800 टेस्ट प्रतिदिन होत असून त्या 2 हजार प्रतिदिन करण्याचा पालिकेचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -