घरCORONA UPDATECorona: 'मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांवर पोहोचण्याची शक्यता'

Corona: ‘मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांवर पोहोचण्याची शक्यता’

Subscribe

मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून बुधवारी १ हजार ३७२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारावर पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मुंबईत पुढच्या ९० दिवसांसाठी सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड महापालिकेने ताब्यात घेतले आहेत. त्यात रुग्णांना पाठवण्याबाबत सेन्टरलाईज व्यवस्था महापालिका करणार आहे. तर उरलेले २० टक्के बेड हॉस्पिटलकडे असणार आहेत.

डायलिसीस रुग्णांची हेळसांड होत असून त्यासाठी डायलिसीस बेड फूल केल्या आहेत. त्यांना कमी खर्चात ही सोय उपलब्ध होईल. गेले तीन चार दिवस मुंबईतील रुग्णांसाठी महापालिकेने एक डॅशबोर्ड तयार केला आहे. त्याच्या ट्रायल झाल्या आहेत. तर काही ट्रायल लवकर सुरू होणार आहेत. एकूण बेडपैकी ICU बेड किती आहेत, हे १९१६ या नंबरला फोन केल्यावर कंट्रोल रूममधून माहिती मिळेल. तिथे दहा डॉक्टर्स आहेत. रुग्णाचा फोन आला की तो कुठे जाणार किंवा कुठल्या बेडबाबतची माहिती हे सगळं सांगण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे १० – १५ मिनिटामध्ये रुग्णालयात व्यवस्था होणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

आतापर्यंत ३२० रेल्वेने ४ लाख २६ हजार लोक बाहेर गेले आहेत. यामध्ये १८७ रेल्वे उत्तर प्रदेशमध्ये गेल्या. या आठवड्यात २०० ट्रेनचे नियोजन असून ३ लाख लोक बाहेर जातील. त्यामध्ये आज ६५ ट्रेन जातील. एका रेल्वेला ९-१० लाख खर्च येतो. आतापर्यंत ७५ कोटी मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले आहेत. केंद्रसरकारशी वाद घालायचा नाही. परंतू नागपूर ते लखनौ ४७३ रुपये तिकिटांचा खर्च आहे. नागपूर ते लखनौ प्रत्यक्ष तिकीट काढले तर ते तिकीट ५०५ रुपये आहे. ऑनलाइन ४७३ रुपये तिकीट आहे. मात्र लोकांनी ५०५ रुपये खर्च करून प्रवास केला. नागपूर ते उधमपूर ६८५ रुपये खर्च तर ऑनलाइन नागपूर ते गोरखपूर ७१५ रूपये प्रत्यक्षात खर्च केला. केंद्राचा दावा आम्ही ८५ टक्के सबसिडी देतो. या आकडेवारीनुसार सध्या तिकीट दर जास्त आहे. केंद्राच्या दाव्यात आणि तिकीट दरात फरक आहे. त्यामुळे आमच्या मित्रांनी आपल्या वरिष्ठ पातळीवर बोलावे आणि श्रेय हवे असेल तर ती व्यवस्था चालू आहे का हे पहावे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. रस्त्यावर चालत जाणाऱ्या परराज्यातील मजुरांना १३ हजार ६५५ बसेस पाठवल्या. खासगी गाड्यांना परवानगी देण्यात आली. त्यामध्ये २ लाख वाहनातून ८ लाख लोकं बाहेर गेले आहेत.

पश्चिम रेल्वेकडे आम्ही जादा रेल्वे गाड्या मागत आहोत. पश्चिम रेल्वे आज ५५ गाड्या सोडणार आहे. तर ३७ गाड्या गुजरातमधून सुटणार आहेत. महाराष्ट्राला फक्त १८ गाड्या दिल्या आहेत. म्हणजे गरज असताना आपल्याला कमी ट्रेन मिळाल्या आहेत. मात्र काही लोकं चित्र तयार करत आहेत की महाराष्ट्र काही करत नाही, म्हणून ही आकडेवारी दिल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्राने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले. २० लाख कोटींपैकी २ लाख कोटी इतकी रक्कम बजेटमधून जात – येत आहे. जीडीपीच्या एक टक्के रक्कम येत आहे. आमच्याकडून पॅकेज मागितले म्हणून खुलासा करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

आज पैशाची चणचण

मुंबई, पुणे शहर ठप्प आहे. केंद्र सरकारकडून ४०-५० कोटी राज्याला देतात. त्यातले हक्काचे पैसे आले नाही. केंद्राने वेळेवर पैसे दिले पाहिजे. जीएसटीचे ५१०० कोटी केंद्राने अजून दिले नाही, असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय प्लॅन आहेत, हे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटमधून कळवले आहे. त्यामुळे आम्ही काम करत आहोत. त्यामुळे कोविडबाबत मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे रहावे हे भान सगळ्यांनी पाळावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा –

लॉकडाऊनमध्ये घोडा, बैलगाड्यांच्या शर्यती; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -