घरCORONA UPDATEबेस्टनंतर रेल्वेत कोरोनाग्रस्ताची संख्या वाढली; ७२ जणांना कोरोनाची लागण

बेस्टनंतर रेल्वेत कोरोनाग्रस्ताची संख्या वाढली; ७२ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

आतापर्यंत ७२ जणांवर कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईतील बेस्टमधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत जात आहे. आता त्याच पाठोपाठ रेल्वेतील कोरोनाग्रस्ताची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ७२ जणांवर कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांचे उपचार पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात सुरू आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. त्यात आता १ जूनपासून रेल्वेच्या विशेष सेवा सुरु झाल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेने वर्कशॉप आणि कारशेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर होण्यास निर्देश दिले आहे. मात्र, आता रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७२ जणांवर कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनामुळे १० कर्मचाऱ्यांनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या ८ तर पश्चिम रेल्वेच्या २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आणखी ४९ संशयितांना उपचारासाठी दाखल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -