घरमुंबईबेस्टची प्रवासी संख्या ५ लाखांनी वाढली

बेस्टची प्रवासी संख्या ५ लाखांनी वाढली

Subscribe

बेस्टच्या महसूलात मात्र मोठी घट

बेस्टची ऐतिहासिक भाडेकपात मंगळवारपासून लागू होताच, मुंबईकर बेस्ट प्रवासाला प्राथमिकता देत असल्याचे दिसून येत आहेत. भाडेकपातीच्या पहिल्या दिवसातच बेस्टची प्रवासी संख्या 5 लाखांपेक्षा जास्त वाढली. येत्या काही दिवसात पुन्हा बेस्ट प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी बेस्ट प्रशासनही अतिरिक्त बसगाड्या चालवण्याच्या तयारीत आहे. मंगळवारपासून बेस्ट भाडेकपाती लागू होताच, मुंबईकरांनी आता बेस्ट प्रवासाकडे आपला मोर्चा वळवला आहे. पहिल्याच दिवशी बेस्टची प्रवाशी संख्या 17 लाखांहून तब्बल 22 लाखांपर्यंत पोहचली आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी बेस्टच्या प्रवासी संख्येत 5 लाखांची वाढ झाली, मात्र बेस्टच्या प्रवासी महसूलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

मंगळवार हा भाडेकपातीचा पहिला दिवस होता. त्यामुळे एरव्ही बेस्ट बसची वाट पाहणार्‍या प्रवाशांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. बेस्टचा प्रवास फक्त पाच रूपये अशा घोषणा प्रवाशांच्या कानावर पडताच ज्या प्रवाशांनी बेस्टच्या प्रवासाकडे पाठ फिरवली होती. ते बसकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी बेस्ट बसगाड्या भरगच्च भरून जात आहेत. बेस्टची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या भाडे कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला बेस्ट समिती, महानगर पालिका आणि राज्य सरकारने मंजुरी दिली. मंगळवारपासून यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याला मुंबईकरांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

महिनाभरात १०० मिनी बसेस येणार
बेस्टच्या तिकीट दर कपातीनंतर प्रवासी संख्येत २९ टक्क्यांनी वाढ झाली, तर महसुलात ३१ टक्क्यांनी घट झाली आहे. बेस्टची प्रवासी संख्या पूर्वीप्रमाणेच ४० ते ४५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ठ्य बेस्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात खासगी तत्त्वावरील बसेस दाखल होणार आहेत. त्याप्रमाणे महिन्याभरात १०० एसी मिनी बसेस येणार आहेत. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

8 जुलै 2019 रोजी बेस्टची तिकीट विक्री 17 लाख 15 हजार 440 इतकी झाली होती. यामाध्यमातून बेस्टला 2 कोटी 12 लाख 33 हजार 260 रुपये महसूल गोळा मिळाला होता. मात्र 9 जुलै 2019 म्हणजे बेस्ट भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी बेस्टची तिकीट विक्री 22 लाख 18 हजार 253 इतकी झाली. या माध्यमातून 1 कोटी 45 लाख 34 हजार 697 महसूल बेस्ट प्रशासनाला मिळाला. म्हणजे भाडेकपातीमुळे बेस्टचा पहिल्याच दिवशी 1 कोटी 90 लाख 15 हजार महसूल बुडाला, मात्र पहिल्साच दिवशी बेस्टच्या प्रवासी संख्येत 5 लाख 2 हजार 813 प्रवासी संख्या वाढली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -