घरमुंबईमुंबईकरांनी अनुभवली स्मशानशांतता

मुंबईकरांनी अनुभवली स्मशानशांतता

Subscribe

सर्व रस्ते,गल्लीबोळ्यात शुकशुकात

संपूर्ण देशात रविवारी लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्युला मुंबईकरांनी उत्स्फुर्त पाठिंबा दिला. प्रत्येक नागरिकांनी स्वत: कुटुंबांसह घरीच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते, गल्लीबोळ्यातील रस्ते तसेच इमारतींच्या आसपासच्या परिसरात रविवारी सकाळपासून शुकशुकाट पसरला होता. एरव्ही रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमुळे गजबलेल्या रस्त्यावर साध्या चिटपाखरही दिसत नव्हती. एखाद्या राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंद पेक्षाही पंतप्रधानांच्या केवळ आवाहनानंतर करोनाशी चार हात करण्यासाठी आम्ही सर्व एकजुटी एकत्र आहोत,अशीच साक्ष रविवारच्या जनता कर्फ्युच्या माध्यमातून जनतेने दाखवून दिली.

जागतिक स्तरावर करोना विषाणूच्या साथीच्या आजाराचा मोठ्याप्रमाणात फैलाव होवू लागला. सर्व देशांच्या आणि राष्ट्राच्या तुलनेत भारतातील हा आजार काही प्रमाणात नियंत्रणात असला तरी भविष्याचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यु लागू करून सर्व नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले होते . त्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिला. सकाळपासूनच प्रत्येक कुटुंबांनी घराबाहेर न पडण्याचा निर्धार करत घरीच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एरव्ही रविवारच्या दिवशी गर्दीने फुलणारी रेल्वे स्थानके, रस्ते, बाजारपेठा, गल्लीबोळात खेळणारी मुले आदी ठिकाणी ओसाड पडली होती. मुंबईत पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच एल.बी.एस मार्ग, एस.व्ही. रोड , एल.जे. रोड, बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. तर इतर रस्त्यांवरही एकही वाहन आणि दृष्टीस पडत नव्हती.

- Advertisement -

सर्वच दुकाने आणि बाजार बंद असल्याने एक प्रकार थांबलेल्या मुंबईचे दर्शन यामुळे घडत होते. प्रत्येक दिवशी रात्रीसह धडधडणारी ही मुंबई रविवार संथ पडली होती. ना कोणती हालचाल होती ना कुठल्या चिटपाखरांचे दर्शन घडत होते. एकप्रकारे गजबजलेल्या या मुंबईत कधीही न अनुभवलेली स्मशानशांतता पाहिली आणि अनुभवलीही. विशेष म्हणजे मुंबईतील अनेक वस्ती आणि झोपडपट्टयांच्या चौका आणि गलीच्या परिसरात जमा होणारी टोळकीही घरीच बसून राहिल्याने करोनाची भीती मुंबईकरांच्या उरात स्थान करून राहिल्याची साक्ष देत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देतानाच भीती नसली तर काळजी घेवू असेच आश्वासन दिल्याचे स्पष्ट होते.

आणि झाला थाळीनाद, शंखानाद

करोनाच आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी झटणारे आरोग्य विभागातील डॉक्टर,नर्सेससह इतर कर्मचारी व अधिकारी वर्ग, पोलिस कर्मचारी वर्ग आणि महापालिकेच्या सफाई कामगारांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे अभार मानण्यासाठी पाच वाजता पाच मिनिटे टाळ्या वाजवून अथवा थाळी वाजवून आभार मानण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्यानुसार मुंबईतील प्रत्येक इमारती, चाळी,झोपडपट्टी टॉवर, बंगला आदींमधील प्रत्येक घरांमधील लोकांनी खिडकी, गॅलरी तसेच इमारती आणि चाळींच्या तसेच झोपडपट्टीच्या मोकळ्या जागेत येत टाळ्या वाजवत आभार मानले. कुणी शंखनाद करतो तर कुणी थाळीनाद करतोय तर कुणी घंटानाद करतो तर कुणी जे मिळेत ते वाजवत होते. त्यामुळे एकाच वेळी हा थाळीनाद,शंखनाद झाल्यामुळे संपूर्ण मुंबईत एक वेगळ्याच्या प्रकारच्या ध्वनीची लहर निर्माण झाली होती आणि ती कुठे तरी करोनाशी आम्ही सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगत होते.

- Advertisement -

पंतप्रधानांनी मानले आभार!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरात नागरिकांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यु पाळला. देशावासियांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन देशवासियांची आभार मानले आहेत. नरेंद्र मोदींनी देशावासियांचे आभार मानले, तसेच करोना संकटकाळात अत्यावश्यक सेवा देणार्‍या सर्व देशबांधवांनाही नमन केले. तर, कोरोनासोबतची आपली लढाई संपली नसून आता खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे, नागरकिांनी घराबाहेर पडू नये. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही मोदींनी म्हटले. एका मोठ्या लढाईसाठी आपण एकमेकांपासून दूर पाहून या लढाईत आपलं योगदान देऊ, असेही पंतप्रधान यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -