घरमुंबई'हा' वैयक्तिक वाद असून गुजराती समाजाचा संबंध नाही

‘हा’ वैयक्तिक वाद असून गुजराती समाजाचा संबंध नाही

Subscribe

ठाण्यात तरुणाला मारहाण करण्याप्रकरणी गुजराती असलेल्या हसमुख शहाला मनसेने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी मागायलाही लावली. त्यामुळे ठाण्यात मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगला आला.

ठाण्यातील घटनेला मराठी विरुद्ध गुजराती असे वळण लागल्यानंतर मंगळवारी गुजराती समाजाने पत्रकार परिषद घेऊन हा वैयक्तिक वाद असल्याचा खुलासा केला. ठाण्यात गुजराती समाज अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत असून व्यवसाय करीत आहे. मराठी समाजाबरोबरच इतर सर्वच समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या वादाला गुजराती विरुद्ध मराठी रंग देऊ नये असेही आवाहन गुजराती समाजाच्या वतीने करण्यात आले. ठाणे पश्चिमेतील नौपाडा परिसरातील सुयश सोसायटीत राहणारे राहूल पैठणकर या मराठी तरुणाला क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून त्याच सोसायटीत राहणारे हसमुख शहा या व्यापाऱ्याने बेदम मारहाण केली होती.

ठाण्यात मराठी विरुद्ध गुजराती असा रंग चढला

हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. मात्र, सोशल मीडियात मराठी विरुद्ध गुजराती असे वळण लागल्यानंतर सोमवारी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हसमुख शहा याला चोप देत महाराष्ट्रासह मराठी माणसाची माफी मागायला लावली होती. त्यामुळे ठाण्यात मराठी विरुद्ध गुजराती असा रंग चढला होता. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील गुजराती समाज, जैन समाज, कच्छी समाजाने एकत्रीत येऊन मंगळवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत घेतली.

- Advertisement -

नक्की वाचा – मराठी तरूणाला मारहाण करणे हसमुख शहाला भोवले; मनसेचे खळ्ळ खटयाक्!

ही झळ इतर गुजराती बांधवांना बसू नये

हा वैयक्तिक स्वरुपाचा वाद होता त्यात समाजाचा संबंध नसल्याचे गुजराती समाजाचे नेते सुरेश गडा आणि प्रकाश नरसाणा यांनी स्पष्ट केले. गुजराती आणि जैन समाज संपूर्ण ठाण्यात वर्षोनुवर्षे शांततेने आणि सलोख्याने राहत आहे. तसेच सगळया समाजांना बरोबर घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे हसमुख शहा यांचा हा वैयक्तिक वाद आहे. त्यात समाजाचा संबंध नाही. वैयक्तिक वादात जो कोणी दोषी असेल त्याला प्रशासनाकडून शिक्षा होईल. त्यामुळे संपूर्ण ठाण्यातील गुजराती समाजाला दोषी ठरवणे योग्य नाही. त्याची झळ इतर गुजराती बांधवांना बसू नये यासाठीच हा खुलासा करण्यात येत असल्याचेही गडा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -