मुंबईत दरवर्षी वाढतंय हवेतील विष!

पावसाळ्यानंतर येणारी थंडी पर्यावरणासाठी हानिकारक; पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी वाढल्याने निर्माण होते विष

Mumbai
मुंबईत दरवर्षी वाढतंय हवेतील विष

पावसाळा संपत नाही तेवढ्यात मुंबईकरांना वेध लागतात थंडी ऋतूचे. या ऋतूमध्ये भलेही मुंबईकरांची उन्हापासून सुटका होत असेल पण, ही थंडी पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर थंडीच्या दिवसांमध्ये पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसेल. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये कार्बन मोनोऑक्साईडच्या गॅसचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये ठरवण्यात आलेल्या सुरक्षा मानकांपेक्षा दर वर्षी मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे.


हेही वाचा: उन्हात चालल्याने होणार मधुमेहापासून सुटका

कार्बन मोनोऑक्साईडसाठी आठ तासांमध्ये प्रति क्यूबिक मीटर २ मिली हे प्रमाण ठरवलं गेलं आहे. यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५-१६ साली कार्बन मोनोऑक्साईडचा दर सुरक्षा मानकांपेक्षा ७ टक्के अधिक आहे. तर, २०१६ – १७ मध्ये याचा दर १० टक्क्यांवर जाऊन पोहोचला. २०१७- १८ वर्षात हाच दर २५ टक्के पाहायला मिळाला. तर, २०१८-१९ मध्ये हा दर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतोय परिणाम

यामध्ये सर्वात जास्त कार्बन मोनोऑक्साईडचा दर ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांमुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसते. शरीरात कार्बन मोनोऑक्साईडची अधिक पातळी हिमोग्लोबिनचा ऑक्सिजनमधील प्रवाहावर परिणाम करतो. सोबतच मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ट्रॅफिक पोलीस, सफाईकर्मचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही समस्या जास्त पाहायला मिळते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here