घरCORONA UPDATEसोसायटीच्या अध्यक्षाला पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण

सोसायटीच्या अध्यक्षाला पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण

Subscribe

मारहाणीनंतर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पदाधिकारी यांनी केला आहे.

पोलीस अधिकारी राहत असलेल्या खोलीच्या मालकाकडे तक्रार केल्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकारी यांनी सोसायटीचे पदाधिकारी यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी घडला. मारहाणीनंतर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पदाधिकारी यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुणगेकर यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील गणेश नगरात राज वैभव को-ऑप-हौसिंग सोसायटीत एकूण ७ इमारती आहेत. या सात इमारतीत ३१९ कुटुंब राहत आहे. त्यापैकी एका इमारती असलेल्या एका खोलीत विष्णू नगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के हे भाडेतत्वावर एकटेच राहत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोसायटीत बाहेरच्या व्यक्तींना परवानगीशिवाय बंदी घालण्यात आलेली आहे, अमोल म्हस्के यांनी सोसायटीला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता, इतर पोलीस अधिकारी यांना त्यांच्या खोलीत राहण्यास दिले होते. या अधिकाऱ्यांचा संपूर्ण सोसायटीत वावर वाढल्यामुळे अधिकारी सोसायटीतील इतर रहिवाशाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागल्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सुर्वे यांनी खोली मालकाला फोन करून तक्रार केली होती.

- Advertisement -

खोली मालकाकडे तक्रार केल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना कळताच त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून रविवारी दुपारी सोसायटीचे पदाधिकारी यांना विष्णू नगर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तुमच्या विरुद्ध तक्रार असल्याचे सांगत म्हस्के आणि दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सुर्वे यांना अर्वाच्य भाषा वापरत पोलीस ठाण्यातील एका खोलीत आणून मारहाण केली. एवढ्यावर न थांबता अमोल म्हस्के यांनी पदाचा गैरवापर करून मंगेश सुर्वे आणि इतर पदाधिकारी यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप राज वैभव सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सुर्वे यांनी केला आहे. सोसायटीच्या पदाधिकारी यांनी झालेल्या प्रकारची माहिती स्थानिक आमदार रवी चव्हाण यांना दिल्यानंतर आमदार चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुणगेकर यांच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या पश्चात झालेला असून या घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याचे  मुणगेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -