घरताज्या घडामोडीCyclone Nisarga: खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदी लागू

Cyclone Nisarga: खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदी लागू

Subscribe

महाराष्ट्रात उद्या निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ मुंबईपासून ४३० किलोमीटर लांब असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचा कलम १४४ लागू करण्यात आला आहे. आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सगळ्या सार्वजनिक जागा, समुद्र किनारे, पार्क या ठिकाणी १४४ कलम लावण्यात आला आहे.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाचा होणार परिणाम लक्षात घेऊन जमावबंदीचा कलम १४४ मुंबई लागू करण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या १२ तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे चक्रीवादळ उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.

१०० ते ११० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग असेल. तो १२० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि गुजराच्या मुख्यमंत्र्यांशी उपाय योजनांबाबत चर्चा केली.

- Advertisement -

हेही वाचा – Cyclone Nisarga Live Update: वादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या वीजपुरवठा खंडित करण्यात येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -