घरमुंबईकिल्ले स्पर्धेत पुरंदर किल्ला ठरला सरस

किल्ले स्पर्धेत पुरंदर किल्ला ठरला सरस

Subscribe

महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्ग परंपरेचा वसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आणि महाराष्ट्रात असलेल्या असंख्य किल्ल्यांची माहिती तरूण पिढीला व्हावी या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सवमंडळा तर्फे दरवर्षी दिवाळी मध्ये किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी किल्ले पुरंदर किल्ल्याने प्रथम क्रमांक पटकावला.

विनामूल्य प्रवेश असणार्‍या या स्पर्धेमध्ये २५ बिल्डिंगच्या तरूण गटांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धकांनी अतिशय मेहनत घेऊन आणि मुळ किल्ल्याची प्रतिकृती करण्यासाठी त्या किल्ल्याचे जास्तीत जास्त बारकावे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दुर्गप्रेमी विलास वैद्य आणि दत्ता बोंबे यांनी या सर्व किल्ल्यांचे परीक्षण केले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्गपरंपरेचे जतन, इतिहासाबाबत तरूणांनी माहिती व्हावी या उद्देशाने मंडळ ह्या स्पर्धेचे आयोजन करते असे मंडळाचे प्रकल्प प्रमुख व दुर्गप्रेमी तन्मय गोखले यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करताना सांगितले. तसेच दरवर्षी यामध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांची संख्या वाढत राहो अशी आशा मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी व्यक्त केली.

या किल्ल्यांनी पटकावले क्रमांक

प्रथम क्रमांक – किल्ले पुरंदर, अरुण निवास, जुनी डोंबिवली, डोंबिवली ( पश्चिम )
द्वितीय क्रमांक – किल्ले विशाळगड, बाळ गोपाळ मित्र मंडळ, मढवी शाळेजवळ, डोंबिवली ( पूर्व )
तृतीय क्रमांक – किल्ले रायगड, विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलोनी, डोंबिवली (पूर्व)

- Advertisement -

उत्तेजनार्थ – किल्ले मल्हारगड,
भागशाला मैदानाजवळ, विष्णू नगर, डोंबिवली (पश्चिम)
उत्तेजनार्थ – किल्ले मर्जन,
आंबेडकर वसाहत, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व)

विशेष पारितोषिके :-
१) किल्ले बाणकोट , पंढरीनाथ स्मृती, नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व)
२) किल्ले लोहगड, अंबर राय कॉम्प्लेक्स, आयरे रोड, डोंबिवली (पूर्व)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -