घरमुंबईख्रिश्चन स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावू

ख्रिश्चन स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावू

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन

ठाण्यामध्ये ख्रिश्चन समुदायाची मोठी लोकसंख्या असली तरीही स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या समुदायाला स्वतंत्र स्मशानभूमी मिळावी म्हणून वर्ष 1999 पासून या समाजाचे विविध नेते, धर्मगुरू पाठपुरावा आणि मागणी करीत होते. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती दिली. यावर नार्वेकर यांनी अल्पवधीतच ख्रिश्चन स्मशानभूमीबाबत योग्य ती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात वनविभाग, ठामपा नगरविकास विभाग, तसीलदार, एमआयडीसी, भूमीअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये स्मशानभूमीसाठी संयुक्तरित्या सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

ठाण्यात मोठी संख्या असलेल्या ख्रिश्चन समाजाला स्मशानभूमी मिळावी म्हणून मंत्रालय, अल्पसंख्याक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून मागणी करण्याचे कार्य ख्रिश्चन समाजाच्यावतीने डॉ. बिनु वर्गीस यांनी वारंवार केले. ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सर्वच समाजासाठी वेगळी स्मशानभूमी आहे. मात्र ख्रिश्चन स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी मोठी अडचण निर्माण होते. 1999 पासून हनुमान नगर रोड नं 28 वागळे इस्टेट, वॉर्ड क्र 15, सर्व्हे नं 520 या जागेत अंत्यसंस्कार केले जात होते. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन ४०० पायर्‍या चढून जावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -