घरमुंबईहाफकिनकडून रेबीजच्या लसींची खरेदी

हाफकिनकडून रेबीजच्या लसींची खरेदी

Subscribe

वितरकांची मक्तेदारी मोडीत काढत केली असून श्वानदंशावरील लसींचा साठा मार्च २०२० पर्यंत खरेदी करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये श्वानदंशावरील लस अर्थात रेबीज लस उपलब्ध होत नसल्याची बोंबाबोंब होत आहे. त्यामुळे महापालिकेने सहा महिन्यांकरता हाफकिन बायो फॉर्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून ९० हजार लसींची खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेने काही औषधांच्या वितरण कंपन्यांची मक्तेदारी मोडित काढून उत्पादन कंपनी किंवा शासनाच्या संस्थेकडून खरेदी करण्याचा निर्णय तत्कालिन अतिरिक्त अश्विनी जोशी यांनी घेतला होता. त्यामार्गाने आता प्रशासनाचे पाऊल पडले असून या रेबीजच्या लसीची खरेदी करत याचा शुभारंभ केला जात आहे.

९० हजार लसींची खरेदी करण्यास मंजुरी

मुंबईतील एकूण रुग्णालये, दवाखाने तसेच आरोग्य केंद्रांपैकी १०१ ठिकाणी श्वानदंश लसीकरण केंद्र निर्माण केलेली आहे. यासर्व ठिकाणी मासिक साधारणत: १५००० श्वानदंश लस मात्रांची आवश्यकता लागते. श्वानदंश लस ही जीवनावश्यक औषध प्रकारात येत असून त्याचा योग्य प्रमाणात साठा संबंधित ठिकाणी केला जातो. परंतु या लसींच्या खरेदीचे कंत्राट संपुष्ठात आल्याने महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने निविदा मागवण्यास सुरुवात केली. मात्र सन २०१९-२०२१ या कालावधीसाठी आवश्यक असलेल्या श्वानदंश लस खरेदीसाठी वारंवार निविदा मागवूनही त्याला कोणताही प्रतिसाद न लाभल्याने या लसींची खरेदी महापालिकेने हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या शासनमान्य संस्थेकडून करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका रेबीज लसीसाठी २३१ रुपये दराने मार्च २०२० पर्यंत सहा महिन्यांकरता ९० हजार लसींची खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी २ कोटी ०७ लाख रुपये खर्च होणार आहे. यापैकी ४९ लाख ८९ हजार रुपये एवढी रक्कम आगाऊ देण्यात आली असून उर्वरीत दीड कोटींची रक्कम ही स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दिली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

१५ हजार २९९ एवढ्या लसींच्या मात्रांचा साठा शिल्लक

मागील स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी रेबीज लस महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. तसेच अशाप्रकारच्या किती लसचा साठा उपलब्ध आहे अशी विचारणा केली होती. यावर उत्तर देताना, आरोग्य विभागाचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी मे ते नोव्हेंबर २०१९ या कालावधी महापालिकेच्या सर्व श्वान लसीकरण केंद्रांना ६१ हजार २६० एवढ्या लसींच्या मात्रा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच ६ डिसेंबर २०१९ पर्यंत १५ हजार २९९ एवढ्या लसींच्या मात्रांचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले होते. आजपर्यंत मुंबई महापालिकेच्या रुग्णालये आणि दवाखाने येथे पुरेशा प्रमाणात श्वानदंश लससाठा पुरवण्या आल्याचेही त्यांनी म्हटले होते.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -