घरमुंबईठाण्यातील रस्ते गेले खड्ड्यात

ठाण्यातील रस्ते गेले खड्ड्यात

Subscribe

मॅरेथॉनचा पाहणी दौरा महापौरांनी 20 मिनिटात आटोपला

अवघ्या एक आठवड्यावर ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आली असतांना शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्यापही बुजविण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे मॅरेथॉन मार्गाचा 10 किमीचा आयोजित करण्यात आलेला महापौर मीनाक्षी शिंदे यांचा हा दौरा अवघ्या 20 मिनिटांत आटोपता घेण्यात आला. मॅरेथॉनच्या सुरवातीच्या टप्यात खड्डेच खड्डे असे चित्र महापौरांच्या नजरेस आल्याने त्यांनी हा दौरा ओटापून अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यानंतर महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक घेऊन आधी खड्डे बुजवा, मगच पाहणी दौरा केला जाईल. असा इशाराही दिला आहे.

येत्या 18 ऑगस्ट रोजी महापालिकेची 30 वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्यानुसार या स्पर्धेसाठी अवघा एक आठवडा शिल्लक आहे. यासाठी गुरुवारी महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, उपमहापौर रमाकांत मढवी आणि शहर अभियंत्यासह पालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. हा पाहणी दौरा मॅरेथॉनचा रूट पाहण्यासाठी जरी आयोजित करण्यात आला होता. मात्र महापौर आणि पालिका अधिकार्‍यांना शहरातील रस्त्यावर पडलेल्या खडयांचा प्रत्यक्ष अनुभव आला.

- Advertisement -

हा पाहणी दौरा पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटी, हरिनिवास सर्कल त्यानंतर तीन पेट्रोल असा सुरू असताना आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाहेरच मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडले असल्याचे लोकप्रतिनिधीच्या निर्दशनास आले. रस्त्यावरील खड्डे बघून सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. अनेक ठिकाणी रस्त्यांची योग्य पद्धतीने कामे झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी पालिका पदाधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे 10 किमीचा हा दौरा अवघ्या 20 मिनिटात आटोपता घेऊन महापौरांसह पालिका अधिकारी पालिकेत दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -