घरमुंबईजेव्हा मंत्रालयात छत गळते तेव्हा...

जेव्हा मंत्रालयात छत गळते तेव्हा…

Subscribe

आज मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याचेही चित्र पहायला मिळाले. मात्र या पावसामुळे आज चक्क मंत्र्यालयातील छतातुन गळती झाल्याचे पहायला मिळाले. मंत्रालयातील एनक्स इमारतीमधील सातव्या मजल्यावरचे पावसाने छत कोसळून पाण्याची गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळाल आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात राज्य सरकारच्याच व्यवसथेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

मंत्रालयातील एनएक्स इमारतीच्या ७ व्या मजल्यावर पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरील बाजूस असलेल्या छताचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. त्यामुळे पावसाचे पाणी थेट सातव्या मजल्यावर पडण्यास सुरुवात झाली. आणि दालनाच्या बाहेरील बाजूस पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

- Advertisement -

याबाबत जानकर यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आल्याचे सांगितले. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. राज्याच्या मंत्र्यांच्या दालनाबाहेर हे चित्र असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -