घरमुंबईठाण्यात अभिजीत राजे - आसावरी यांच्या विवाहानिमित्त ‘राजेशाही’ मिठाई

ठाण्यात अभिजीत राजे – आसावरी यांच्या विवाहानिमित्त ‘राजेशाही’ मिठाई

Subscribe

सध्या घराघरात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’ सध्या खूपच रंजक वळणावर आली आहे. या मालिकेने काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेमधील अभिजीत राजे आणि आसावरी यांचे प्रेम प्रेक्षकांना आवडत असल्याने अनेकांनी ही मालिका आपल्या जवळची वाटू लागली आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना दोघांचे प्रेम जुळून येईल की नाही याची उत्सुकता लागली होती. मात्र, मालिकेत वेगळे वळण आले. कळत-नकळतपणे अभिजीत राजेंनी आसावरी पुढे आपल्या प्रेमाची कबुली दिली. तिला लग्नाची मागणी घातल्यानंतर अभिजीत आणि आसावरी दोघांचा विवाह सोहळा मालिकेत संपन्न होणार आहे.

प्रेक्षकांना देखील या विवाह सोहळ्याबद्दल उत्सुकता असून या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात चक्क राजेशाही मिठाईचे नवे कलेक्शन देखील लाँच करण्यात आले आहे. या राजेशाही मिठाईमध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि जेली असे प्रकार असून राजेशाही तुकडा, राजेशाही मोहोर, राजेशाही प्रेम आणि राजेशाही खूशी अशी या मिठाईची नावे असून १ हजार ४०० रुपये किलोने ही राजेशाही मिठाई विकली जात आहे. या राजेशाही मिठाईचे कलेक्शन १९ जानेवारीपर्यंत या दुकानात उपलब्ध असून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

- Advertisement -

राजेशाही मिठाईपैकी राजेशाही तुकडा या मिठाईला ग्राहकांनी जास्त पसंती दिली आहे. तसेच या मिठाईच्या दुकानात मालिकेतील विवाह सोहळ्याच्या भागाची शूटिंग देखील करण्यात आली आहे. ही राजेशाही मिठाई खरेदी करण्यास ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे प्रशांत कॉर्नरचे व्यवस्थापक शैलेंद्र चतुर्वेदी यांनी सांगितले.

प्रत्येक मराठी घराघरात आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. सध्या या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असून याचे प्रोमो, जाहिराती देखील प्रदर्शित करण्यात येत आहेत. झी मराठी वाहिनीवर ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा विवाह विशेष भाग देखील रविवारी झी मराठीवर संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -