घरमुंबईकिन्हवलीचा संगम पूल अखेरच्या घटकेत

किन्हवलीचा संगम पूल अखेरच्या घटकेत

Subscribe

पुलाची पडझड सुरूच; संरक्षक कठडे ढासळले

शहापूर मुरबाड या दोन्ही तालुक्यांंना जोडणार्‍या किन्हवली जवळील संगम पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून हा पूल सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. हा जुना जीर्ण झालेला पूल पाडून या मार्गावर वेळीच संबंधित पुलाचे नव्याने बांधकाम केले नाही, तर भविष्यात सावित्री पुलाच्या अपघाताच्या घटनेची पुनरावृत्ती होऊन अनेक प्रवाशांचा बळी जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहापूर-मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणार्‍या किन्हवली जवळील हा संगम पूल 40 वर्षांपूर्वीचा जुना आहे. या पुलाचे बांधकाम आता जीर्ण झाले असून पुलाचे संरक्षक कठडे ढासळलेले आहेत. तसेच पुलाला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या दिसत असून दोन्ही बाजूंनी झाडे झुडपे उगवली आहेत. हा पूल कमकुवत झाला आहे. पुलाची देखभाल व दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत अखेरच्या घटका मोजत असून अशा अवस्थेत ही येथे अवजड वाहनांची रात्रदिवस वाहतूक सुरू आहे. अवजड वाहन गेल्यावर पुलाला मोठे हादरे बसतात. परिणामी बांधकाम कमकुवत झालेला हा पूल केव्हाही कोसळेल अशी भीती या भागातील वाहनचालक व प्रवासी व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

किन्हवली जवळील संगम पुलाची दैन्यवस्था झाली आहे हे खरे आहे. हा पूल फार जुना आहे. लवकरच या पुलाची डागडुजी व दुरुस्तीची कामे आम्ही हाती घेणार आहोत.
– अरुण जाधव, उपअभियंता, शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -