घरमुंबईअकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या यादीत ६९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या यादीत ६९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Subscribe

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी २२ जुलैला दुपारी ३ वाजता जाहीर झाली. यावेळी तब्बल ६९ हजार १७०विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र बहुतेक नामांकित कॉलेजांची कट ऑफ ही ८५ टक्क्यांवर राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजांमधील प्रवेशापासून वंचित राहावे लागले. दुसर्‍या यादीमध्ये पहिला पसंतीक्रम तब्बल १६ हजार ३३७ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुसर्‍या यादीतही काही कॉलेजांची कट ऑफ एक ते दोन टक्क्यांनी कमी झाली, तर काही कॉलेजांची एक ते दीड टक्क्यांनी वाढल्याचेही चित्र आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज न मिळाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पहिल्या यादीतील १ लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी फक्त ६१ हजार ६४५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. त्यामुळे दुसर्‍या फेरीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाल्या होत्या. दुसर्‍या फेरीसाठी १ लाख ३३ हजार २४५ जागांसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७ हजार ७८५ विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार १७० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉमर्सचे सर्वाधिक 46 हजार 648 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याखालोखाल सायन्स १६ हजार ४७१, आर्ट्स ५ हजार ६५१ व एमसीव्हीसीसाठी ४०० विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांनी http://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर जाऊन centralized allocation result 2 या ऑप्शनला क्लिक करून आपला अ‍ॅप्लिकेशन क्रमांका टाकावा.त्यानंतर विद्यार्थ्याला अ‍ॅलॉटमेंट झालेल्या ज्युनियर कॉलेजची माहिती दिसेल.

- Advertisement -

पहिल्या पसंतीचे कॉलेज १६ हजार ३३७ विद्यार्थ्यांना तर दुसर्‍या पसंतीचे कॉलेज 13 हजार 137 विद्यार्थ्यांना मिळाले. परंतु पहिल्या यादीप्रमाणे पहिल्या पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 11 हजारपेक्षा जास्त होती. दुसर्‍या पसंतीक्रमापासून प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज मिळवण्यासाठी पुढील यादीची वाट पाहण्याची संधी आहे. तरीही दुसर्‍या यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने किती विद्यार्थी पुढच्या यादीला पसंती देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यादीत प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांनी २३ ते २५ जुलैपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत. प्रवेश न घेणार्‍या विद्यार्थ्यांना २७ व २९ जुलै रोजी तिसर्‍या गुणवत्ता यादीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा मिळणार आहे. जे विद्यार्थी हा क्रम बदलणार नाही त्यांचा पूर्वीचा पसंतीक्रम ग्राह्य धरला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -