दसऱ्यानंतर सायन फ्लायओव्हरला मुहूर्त?

Mumbai
sion flyover will close on may 170 bears change
सायन फ्लायओव्हर

तब्बल ९ महिन्यापासून रखडलेल्या सायन फ्लायओव्हरच्या कामाला अखेर थोडा धक्का मिळाला आहे. सायन फ्लायओव्हरच्या कामासाठी जॅक आणि बेअरींग यायला आता येत्या दोन ते तीन दिवसात सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेही मुंबई वाहतूक विभागाकडे सायन फ्लायओव्हरच्या कामासाठी फ्लायओव्हर बंद करण्याची परवानगी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ५० जॅकचा पहिला लॉट सायन फ्लायओव्हरखाली दाखल होईल. एकूण १०० जॅकचा उपयोग या कामासाठी होणार आहे. त्यापैकी पहिला लॉट हा दाखल होईल. त्यानंतर दुसरा लॉट हा १५ ऑक्टोबरपर्यंत येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर बेअरींगही पुढील आठवड्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे सायन फ्लायओव्हरच्या कामाला दसरा संपताच म्हणजे १० ऑक्टोबरपासून परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र एमएसआरडीसीकडून वाहतूक विभागाला देण्यात येणार आहे. पण वाहतूक विभागाचा निर्णय हा ब्लॉकचा कालावधी निश्चित करण्यासाठी अंतिम असेल. सणासुदीचा दसरा आणि दिवाळीचा कालावधी पाहता वाहतूक विभाग काय निर्णय घेणार हे येत्या दिवसातच स्पष्ट होईल. सायन फ्लायओव्हरच्या कामासाठी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीत बदल तसेच वाहतूक वळवण्यातही येणार आहे. बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हरचे काम सुरू झाल्यानंतर सायन फ्लायओव्हरवरील काही भार वळवण्यात येईल, असेही नियोजन करण्यात येत आहे.

४० दिवसांचा ब्लॉक

सायन फ्लायओव्हरसाठी आधीच्या कामानुसार ३ ते ४ महिन्यांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. पण या कामात वापरण्यात येणाऱ्या जॅकमुळे आथा हे काम ४० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. या संपूर्ण कामामध्ये जॅकचा वापर करून एकाच वेळी फ्लायओव्हरखालील बेअरींग बदलण्यात येतील. तसेच बेअरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर गर्डरच्या जॉईंटचे काम करण्यात येणार आहे.