घरमुंबईमुंबईत रुग्णांसाठी स्पेशल 'इएनटी' ओपीडीची सुरुवात

मुंबईत रुग्णांसाठी स्पेशल ‘इएनटी’ ओपीडीची सुरुवात

Subscribe

नुकतंच या हॉस्पिटलमधील कान, नाक, घशाच्या ओपीडीचं आणि मोड्युलर ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर हे हॉस्पिटल प्रकाशझोतात आल्याचं बोललं जातंय.

महापालिकेकडे नाक, कान आणि घसा याचं स्पेशल हॉस्पिटल असूनही रुग्णांची गर्दी केईएम, नायर आणि सायन हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात असते. पण, मुंबईतील फोर्ट या परिसरात महापालिकेचं स्पेशल इएनटी म्हणजे कान, नाक, घसा याचं स्पेशल हॉस्पिटल आहे. जिथे मोठ्या प्रमाणात फक्त याच निगडीत उपचार केले जातात. नुकतंच या हॉस्पिटलमधील कान, नाक, घशाच्या ओपीडीचं आणि मोड्युलर ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर हे हॉस्पिटल प्रकाशझोतात आल्याचं बोललं जातंय. काहीच लोकांना या हॉस्पिटलविषयी माहिती होती. त्यातही महत्त्वाचं हे हॉस्पिटल मोठं असून अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी समृद्ध आहे. सेठ आत्मसिंह जेसासिंह बांके बिहारी असं या हॉस्पिटलचं नाव असून कान, नाक, घसा च्या हॉस्पिटलमध्ये १०० खाटांची सुविधा देण्यात आली आहे. महापालिका मुख्यालय परिसरातून ५०० मीटर अंतरावर हे हॉस्पिटल आहे.

हॉस्पिटल केलं अपग्रेड

हॉस्पिटलमध्ये रुग्णांना प्रभावी उपचार मिळावेत म्हणून २०१७ पासून याचं रेनोव्हेशन केलं जात आहे. २४ करोड रुपये खर्च करत हॉस्पिटलला आणखी सशक्त करण्यासाठी शिवाय, ऑपरेशन थिएटरला संक्रमणमुक्त बनवण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, आजही या हॉस्पिटलचं अपग्रेडेशनचं काम सुरू आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे.

- Advertisement -

सर्वात जास्त कानाचे रुग्ण

या हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधांविषयी मुख्य मेडिकल ऑफिसर डॉ. दीपिका राणे यांनी सांगितलं की, ” या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे रुग्ण येतात. पण, सर्वात जास्त कान, नाक, घसाचे रुग्ण जास्त येतात. त्यातही कानांच्या समस्या असलेले रुग्ण जास्त येतात, त्यासोबतच गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणारे रुग्ण ही मोठ्या प्रमाणात येतात. नव्या टेक्नोलॉजीसोबत ऑपरेशन टेबलची संख्या ही देखील वाढवली गेली आहे. हे महापालिकेचं एकमेव हॉस्पिटल आहे जिथे इएनटीसाठी स्पेशल आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर आहे. ”

” या हॉस्पिटलविषयी जास्तीत जास्त रुग्णांना माहिती झाली पाहिजे आणि लोकांनी या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा फायदा घेतला पाहिजे. ” – डॉ. पद्मजा केसकर, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -