ठाकरे आडनाव कसं लागलं? वाचा रंजक कथा

ब्रॅण्ड ठाकरे आडनावाचा हा आहे जनक

Thackeray

जेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिलेले व्यक्तीमत्व अशी प्रबोधनकार ठाकरे यांची ओळख. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेकांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. पण सध्याच्या राजकीय वातावरणात ठाकरे ब्रॅण्ड घेऊन सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण ठाकरे ब्रॅण्ड जन्माला घालणारी व्यक्ती म्हणजे खुद्द प्रबोधनकार ठाकरे हे विसरून चालणार नाही.

ठाकरे कुटुंबाची वंशावळ कुठली हा अनेकांच्या संशोधनाचा आजही विषय आहे. त्याअनुषंगानेच ठाकरे नाव कस लागल यामागेही एक इतिहास आहे. ठाकरे घराण्याला हे आडनाव मिळण्याचे संपुर्ण श्रेय जाते ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांना. प्रबोधनकार म्हणजे केशव ठाकरे यांनीच ठाकरे आडनाव पहिल्यांदा वापरायला सुरूवात केली. त्यामागेही एक विशेष कारण आहे. कोलकात्यात जन्म घेतलेले ब्रिटीश लेख विलियम मेकपिस थैकरी (William Makepeace Thackeray) यांच्या लिखाणाची केशव म्हणजे प्रबोधकार ठाकरे यांच्यावर छाप होती. त्यांच्या उपहासात्मक लिखाणाचा प्रबोधनकारांवर प्रभाव होता. पुढे प्रबोधनकारांनीही विलियम थैकरी (Thackeray) यांच्या आडनावाचे स्पेलिंग वापरत ठाकरे हे नाव लावण्याची सुरूवात केली. आजही ठाकरे घराण्यातील सर्वच व्यक्ती ह्याच आडनावाची स्पेलिंग वापरतात.

Thackeray

प्रबोधनकारांनी ठाकरे यांचे आजोबा कृष्णाजी माधव ठाकरे हे मात्र पनवेलकर हे नाव वापरत होते. कारण ते पनवेल येथे येऊन राहिल्याने त्यांनी पनवेलकर असे नाव लावायला सुरूवात केली होती. प्रबोधनकार ठाकरे यांचे वडील सीताराम ठाकरे हेदेखील पनवेलकर हे नाव लावत होते. पण सीताराम पनवेलकर यांनी आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देताना ठाकरे हे आडनाव लावले. पण आपले ठाकरे (Thakre) या आडनावाची स्पेलिंग बदलत पुढे प्रबोधनकारांनी (Thackeray) हे आडनाव वापरायला सुरूवात केली.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रातून…

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म कायस्थ प्रभू या जातीत १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल, जिल्हा ठाणे येथे वडील सीताराम आणि आई काशीबाई उर्फ ताई या सुसंस्कृत दांपत्याच्या पोटी झाला. ठाकरे घराणे मूळचे भोर संस्थानातील पाली या गावचे. मध्यंतरी धोप या किल्याच्या रखवालदारीवरुन त्यांच्या काही पिढयांना धोपकर या नावानेही ओळखू लागले.